पानोडी । झुंजार न्यूज
‘ हायजिन फर्स्ट ‘ अहमदनगर आयोजित जिल्हास्तरीय “स्वच्छतेकडून आरोग्याकडे ” या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील बालपण इग्लीश स्कूलच्या विदयार्थ्यानी यश मिळविले .
कु .भावना सोमनाथ दिघे, कु .समृद्धी सोमनाथ त्रिभन, कु .श्रद्धा दीपक म्हसे या तीन विद्यार्थ्यांना सुहाना प्रवीण मसाल्याचे डायरेक्टर आनंद चोरडिया, अहमदनगरचे आमदार संग्राम भैय्या जगताप, प्रसिद्ध उद्योजक व आय लव नगरचे संस्थापक नरेंद्र फिरोदिया यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
स्वच्छतेकडून समृद्धीकडे हा निबंध विषय बालपण स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर लेखन करत सदर निबंध स्पर्धेत यश संपादन केले. वर्षभर बालपण स्कूलचे विद्यार्थी विविध राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत भाग घेत असतात. या शैक्षणिक वर्षात बालपण स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तेरा निबंध स्पर्धेत सहभाग नोंदवत यश संपादन केले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्व बालपण स्कूलच्या शिक्षकांनी व स्कूल प्रमुख सौ.सोनाली मुंढे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Post Views: 679
