शिर्डी । झुंजार न्यूज
देशात दुसऱ्या क्रमांकाचे देवस्थान असलेल्या साईबाबा संस्थान शिर्डीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नागपूर येथील वस्त्र उद्योग विभागात रेशीम संचालक म्हणून कार्यरत असलेल्या गोरक्ष गाडीलकर यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारला .
गाडीलकरांना अन्य अधिकाऱ्याकडे आपला पदभार सोपवून तात्काळ साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी पदाची सूत्रे ताब्यात घ्यावी व पदभार स्वीकारावा असा आदेश सामान्य प्रशासन विभागाचे सचिव नितीन गद्रे यांनी १२ फेब्रुवारी २०२४ रोजी काढले असून गेल्या काही दिवसापासून साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी पद हे रिक्त होते त्यांच्या पदावर प्रभारी उपकार्यकारी अधिकारी म्हणून तुकाराम हुलवळे हे काम पाहत होते आता मुख्य कार्यकारी पदी गोरक्ष गाडीलकर यांची नियुक्ती झाल्यामुळे साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय विभागात काम करताना मोठी गतिमानता येणार आहे .
वर्षाकाठी कोट्यावधी साईभक्त साईबाबा समाधी दर्शनासाठी येत असतात कोट्यावधीचे दान देखील साईबाबा संस्थानला मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत असते साईबाबा संस्थानच्या कामात लवकरच मोठी गतिमानता येणार आहे
