यांच्या श्रद्धांजली निमित्त ” एक हात मदतीचा “
संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील आपल्या सर्वांचे मित्र विजय दरोळे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले , बातमी समजली आणि मन सुन्न झाले . शेवटच्या स्वासापर्यत विजय लढला, आजाराशी देखील संघर्ष केला. संघर्ष विजूच्या रक्तातच होता, विजूला सामाजिक कार्य करायला गरिबी कधीच आडवी आली नाही . स्वतः पेक्षा समाजासाठी खुप लढला, प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून गेला. अडचणीत असलेल्या माणसाला मदतीचा हात दिला . विजुच्या याच प्रामाणिक स्वभावामुळे रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष देखील झाला होता . विजयच्या माध्यमातून मोठे संघटन उभे राहिले होते .
समाजाच्या कामात विजय ने स्वतःला झोकून दिले होते . त्या मुळे विजय ने स्वतःकडे कधीच पाहिले नाही . परिस्थिती बेताची असल्याने कुटूंबाला देखील पुरेसा वेळ देता आला नाही . इतका निस्वार्थी प्रामाणिक माणूस मी माझ्या आयुष्यात कधी पहिला नाही . स्वतःचा स्वार्थ कधीच पाहिला नाही . विजय कुटुंबाचा आधारस्तंभ होता
तो आधारस्तंभच निघून गेलाय . कुटुंब पोरकं झालंय . आपण सर्व जण विजय च्या परिवाराच्या दुखात आहोतच . पण श्रद्धांजली कार्यक्रम संपल्यावर कुटुंब एकटं असणार आहे . अजून परिवाराचे खूप लांब दिवस जायचे आहेत . विजय ची पत्नी मुलं निराधार, पोरकी झाली आहेत* . त्यांना आधार द्यावा लागेल .आपण जर आधार देऊ शकलो नाही तर येणारा काळ आपणास माफ करणार नाही, भविष्यात चळवळीत काम करण्यासाठी कुठलाही तरुण पुढे येणार नाही . कुटुंबाचे मनोबल असे खचून देऊन चालणार नाही .समाज म्हणून प्रत्येकाने विजूच्या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे . आपल्या मदतीने पुन्हा कुटुंब सावरू शकेल,
मुलांचे शैक्षणिक, कौटुंबिक हाल होणार नाहीत या साठी प्रयत्न* करणे गरजेचे आहे . एक हात मदतीचा या उक्ती प्रमाणे प्रत्येक व्यक्तीने टोपी टॉवेलचा दुखवटा न करता *जलदान विधीच्या दिवशीच दुखवटा म्हणून आर्थिक मदत करावी . थोडे दिवस दुःख हलके होईपर्यंत आधार होईल . विजयच्या कुटुंबाला मदत केल्याशीवाय श्रद्धांजली पूर्ण होणारच नाही अशी प्रत्येकाची भावना आहे .
विजूचा भाऊ म्हणून, वडीलकीच्या नात्याने आधार देऊ . विजय आपल्यात नाही ही भावना आज देखील मनाला वेदना देणारी आहे .त्याचा निरागस चेहरा आजही नजरेसमोरून जात नाही . विजू च्या आठवणी कायम स्मरणात राहतील . ” एक हात मदतीचा या प्रमाणे हजारो हात विजय च्या कुटुंबाला मदतीसाठी सरसावतील ” आणि तीच खरी विजय ला श्रद्धांजली ठरेल .
शोकाकुल – विजयराव वाकचौरे व रिपाई पक्ष संगमनेर तालुका , मित्रमंडळ संगमनेर
” जलदान विधी व शोकसभा “
13/2/2023 रोजी ” समाज मंदिर संगमनेर ” , (पुणे हायवे) येथे
सकाळी *9 :00 वा होईल*
