नेवासा । झुंजार न्यूज
केंद्र व राज्य सरकारने आदिवाशीकरिता विविध योजना राबविल्या मात्र त्यांचा फायदा आदिवाशी समाज्याला होताना दिसत नसल्याने कार्यकर्त्यानी विविध योजनासह महामंडळाच्या संपुर्ण माहिती आदिवाशी समाज्याच्या माणसापर्यत पोहचवा म्हणजे खेडो – पाडी राहणार्या झोपडीतील माणसांना त्यांचा फायदा होईल असे आवाहन एकलव्य आदिवासी बहुजन पार्टी चे संस्थापक अध्यक्ष रेवननाथ जाधव यांनी केले .
नेवासा तालुक्यातील भेंडा , कुकाणा , वडूले , अंतरवाली , शहापूर , देडगांव आदी गावांच्या दौऱ्या प्रसंगी शहापूर या गावच्या भेट प्रसंगी जाधव बोलत होते .
यावेळी रेवननाथ जाधव पुढे म्हणाले की , अकोले तालुक्यातील राजूर येथे आदिवासीकरिता महामंडळ स्थापन केले असताना बहुतांशी आदिवाशीना यांची कल्पनाचं नाही तर ज्यांना माहिती आहे असे आदिवाशी तेथे जातात मात्र तेथील आधिकारी कुठली ही व्यवस्थित माहिती कोणी देत नसल्याने त्यांचा फायदा आदिवाशी समाज्यातील लोकांना होत नसल्याची खंत व्यक्त करत जाधव म्हणाले की , आता कार्यकर्त्यानी गावो गावी फिरुन आदिवाशी वस्तीवरील लोकांना विविध योजनेसह महामंडळाची सखोल माहिती द्या म्हणजे समाज्याला त्यांचा फायदा होईल .
यावेळी पक्षाचे प्रवक्ते संजय वाल्हेकर ,महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख तुषार आहिरे , प्रभारी नाशिक जिल्हा महिला अध्यक्षा श्रीमती निर्मला पवार , शिंदे गावातील शाखा अध्यक्षा श्रीमती गीता पवार , शहापूर येथील भारत गायकवाड , बाळासाहेब गायकवाड , मोहन गायकवाड , भास्कर गायकवाड ,भाऊ गायकवाड आदी मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते . तर एकलव्य आदिवासी बहुजन पार्टी शहापूर या गावी स्थापना करण्यात आली .
Post Views: 686
