पाथरे । झुंजार न्यूज
राहाता तालुक्यातील पाथरे बु॥ येथील श्री छत्रपती शिवाजी विदयालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक संपूर्ण गावांतून काढण्यात आली . तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. तसेच हर्बल गार्डन मध्ये विविध औषधी वनस्पतींची वृक्ष लागवड करण्यात आली.
यावेळी महाविद्यालय प्रती कृतज्ञतेची भावना म्हणून इयत्ता बारावी विज्ञान शाखेच्या वतीने महाविद्यालयास शैक्षणिक साहित्य प्रमुख अतिथीच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.
यावेळी शिवचरित्रकार मा.प्रा. राजेंद्र खैरनार सर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर व्याख्यानातून म्हणाले की ,
” आजच्या युवकांना आपले जीवन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखे जगता आले पाहिजे यासाठी आपण याच वयात कार्य कुशल असणे आवश्यक आहे तसेच समाजातील प्रत्येक घटकाचा आदर ही करणं अपेक्षित आहे यासाठी आदर्श म्हणून महाराज हे तुमचे ऊर्जास्रोत आहेत ”
कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी प्रवरा बँकेचे संचालक गंगाधर चंद्रभान पा घोलप हे होते . तर संरपच उमेश पाटील घोलप , कृषी उत्पन्न बाजार समिती उपसाभपती अण्णासाहेब भाऊसाहेब पाटील कडू , भाऊसाहेब बाबुराव पाटील घोलप, (माजी संचालक पद्मश्री विखे पाटील कारखाना) श्री. अशोक चंद्रभान पाटील कडू (चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी पाथरे बुद्रुक ) श्री. शिवाजीराव नरहरी पाटील घोलप (माजी संचालक पद्मश्री विखे पाटील कारखाना) श्री सोपानराव लक्ष्मण पाटील घोलप (माजी सरपंच) श्री. बाळासाहेब भागवत पाटील घोलप (मा व्हा. चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी सोसायटी पाथरे बुद्रुक) श्री. हिरामण चंद्रभान पाटील कदम (माजी सरपंच पाथरे बुद्रुक) , गंगाधर भाऊसाहेब पाटील कडू, अँड पोपट मुरलीधर पाटील कडू , राधाकृष्ण घोलप , संजय पाटील घोलप , विलास पाटील घोलप , दिलीपराव पाटील घोलप( सर) , अशोक रावसाहेब पाटील घोलप , राजेंद्र कडू सर , विद्यालयाचे प्राचार्य एन बी तांबे सर , उपप्राचार्य वाणी मॅडम , कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक हारदे सर , माध्यमिक विभागाचे समन्वयक पारखे सर , प्राथमिक विभागाचे समन्वयक घुगे सर , व सर्व शिक्षक – शिक्षिका, विद्यार्थी- विद्यार्थिनी, ग्रामस्थ,पालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट पारखे सर यांनी केले. ढोल ताशा, आकर्षक रांगोळी , रंगरंगोटी, भगवे झेंड्यांनी परिसर शिवमय झाला होता. तर जय भवानी… जय शिवाजी… जय जिजाऊ…. जय शिवराय अशाघोषणांनी परिसर दणाणून गेला होता .
