शांततेच्या मार्गाने आंदोलकांना प्रशासनाने दडपशाहिने हटवले: संगमनेर शहरात संतापाची लाट
संगमनेर । झुंजार न्यूज
ऑक्टोबर 2022 मध्ये आलेल्या पुराने म्हाळुंगी नदीवरील पूल खचला होता. यासाठी आमदार थोरात यांनी पाठपुरावा करत निधी मिळवला. मात्र भाजपाने यामध्ये राजकारण करून निधी रोखला. या कामात कोणतेही योगदान दिले नाही. ते मंत्री विखे यांच्या हस्ते भूमिपूजनाचा घाट स्थानिक भाजपाच्या नेत्यांनी घातल्याने स्थानिक नागरिकांनी यास मोठा विरोध दर्शवला असून सत्ताधारी भाजपाने पोलीस व प्रशासनाकरवी गोरगरीब स्थानिकांवर दडपशाही सुरू केली आहे.
म्हाळुंगी नदी पुलाचे भूमिपूजन आज सत्ताधारी भाजपचे मंत्री विखे यांच्या हस्ते होत असून यास नागरिकांनी मोठा विरोध केला आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये आलेल्या मोठ्या पुरामुळे हा पूल खचला होता. या ठिकाणी आमदार बाळासाहेब थोरात व सौ दुर्गाताई तांबे यांच्या प्रयत्नातून नागरिकांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती .याचबरोबर आमदार थोरात यांनी मुख्यमंत्र्यांकडे या पुलाच्या कामाकरता साडेचार कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली. मात्र भाजपाच्या स्थानिक राजकारणातून हा निधी रोखला गेला .
याउलट विकास कामाचा निधी इकडे वळवला .असे असतानाही दीड वर्षे हे काम थांबवले. याकरता स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी निदर्शने केली, उपोषण केली, विद्यार्थ्यांनी आंदोलने केली, तरीही पालकमंत्री विखे व सत्ताधारी भाजप यांना फरक पडला नाही .मात्र आता फक्त श्रेय घेण्यासाठी भूमिपूजनाचा घाट घातला गेला असून हे संगमनेर च्या सुज्ञ नागरिकांनी ओळखले आहे .
ज्यांचे या कामात कोणतेही योगदान नाही ते मंत्री विखे येथे येत असून त्यांच्या वडिलांचा नाव देण्याचा हा कोणता प्रकार यावरून नागरिक संतप्त झाले आहे.
उपोषणाला बसलेल्या नागरिकांनी यास तीव्र विरोध दर्शवला. यावेळी संवेदनशील मार्गाने उपोषण करणाऱ्या सर्वांना तेथून उठवण्यात आले तर त्यांचा उपोषणाच्या मंडपही हटवण्यात आला आहे. अत्यंत दडपशाहीने हे काम सुरू आहे .या विरुद्ध संघर्ष समितीच्या वतीने किरण पाटणकर ,अमोल डुकरे, बंटी पवार, बंडू म्हाळस ,राकेश परदेशी, संकेत पाटणकर, कैलास साळुंखे यांसह विविध कार्यकर्त्यांनी मोठा विरोध दर्शवला आहे.
या घटनेमुळे संपूर्ण संगमनेर मध्ये संतापाची लाट उसळली असून सोशल माध्यमांवर या दडपशाहीचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे
