शिर्डी । झुंजार न्यूज
संगमनेर येथील रहिवासी व मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रमुख म्हणून काम पाहिलेले तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघात चांगला लोकसंपर्क असलेले नचिकेत रघुनाथ खरात हे शिर्डी मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. हा मतदारसंघ जरी राखीव असला तरी खासदार हा राखीव नसतो. तो सर्वसमावेशक असतो, त्यामुळे मतदारसंघातील विकास कामांसाठी विशेषतः रोजगार, आरोग्य, पर्यटन, महिला व बालकल्याण, आदिवासी विकास, दळणवळण आदी मूलभूत सुविधांसाठी मी सतत प्रयत्नशील राहील असेही ते म्हणाले. शिर्डी है आंतरराष्ट्रीय दर्जाचे धार्मिक स्थळ असल्याने शिर्डीचा अधिकाधिक विकास व विशेष करून परिसरातील सर्वच रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे याला प्राधान्य देण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शासनाच्या कल्याणकारी या जना समाजातील तळागाळातील व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी आतापर्यंत अनेक शिबिरांचे आयोजन केलेले आहे, शासन आपल्या दारी आणि शासकीय योजनांची जत्रा या महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वकांक्षी उपक्रमांमध्ये ही ते सहभागी झालेले आहेत. कोविड काळात विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून नऊ हजार व्यक्तींना राशन कीटचे वाटप करण्याबरोबरच ४००० व्यक्तींना प्रतिबंधात्मक प्लस देण्याचे कामही त्यांच्यामार्फत करण्यात आले. त्याचबरोबर ५६० व्यक्तींचे जे जे हॉस्पिटल मुंबई व ससून रुग्णालय पुणे येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यातही त्यांनी सहभाग घेतला. अंध व्यक्तींसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ११५ अंध बांधवांना रोजगार उपलब्ध कार्यात यशस्वी प्रयत्न केले. आरोहन या पालघर जिल्ह्यात त्यांनी केले.
यादरम्यान सहा एकात्मिक विकास प्रकल्पांच्या माध्यमातून दुर्गम पाड्यांवर शेती, शिक्षण आणि रोजगार यासाठी सौर प्रकल्पांची उभारणी केली. ते संगमनेर येथील रहिवासी असल्याने संगमनेर परिसरासाठी ही त्यांनी चांगले काम केलेले आहे. अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा संगमनेरच्या माध्यमातून विविध नाट्य आणि एकांकिका स्पर्धेमध्येही ते सहभागी होते. जागृती कला समूहाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील ग्रामीण परिसरामध्ये अंधश्रद्धा, शिक्षण, व्यसनमुक्ती, पर्यावरण, सामाजिक सलोखा, कचरा व्यवस्थापन व इतर सामाजिक विषयांवर ४८ लिखाण आणि सादरीकरण सुद्धा त्यांनी केले आहे. जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहता तालुक्यामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिवीर लहुजी साळवे, मुक्ता साळवे, आदिवासी बांधवांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, रोजगार, शेती आदी विषयांवर काम केले आहे. असीम चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या माध्यमातून वांद्रे पूर्व येथील झोपडपट्टी मधील विद्यार्थ्यांना महापालिका शाळा प्रवेशासाठी काम, चिराग ग्रामीण विकास संस्था मुंबईच्या माध्यमातून भारतातील उत्तराखंड, आसाम, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओरिसा कर्नाटक, केरळ अशा नऊ राज्यांमधील १६००० कुटुंबांकडे पोहोचून दुर्गम भागातील लोकांना मोफत सौरदिवे पोहोचवण्याचे काम केले .
महात्मा फुले सावित्रीबाई फुले आदी महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या विविध कार्यक्रमांचे त्यांनी आयोजन केलेले आहे. प्रा. रघुनाथ खरात यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील मातंग समाज प्रबोधन यात्रेमध्ये सहभाग तसेच बहुजन रयत परिषदेचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या नेतृत्वातून समाज प्रबोधन यात्रेमध्ये ही त्यांनी सहभाग घेतलेला आहे. जपान येथील आय वाय एफ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या युवा महोत्सवामध्ये ही त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे तालुका, जिल्हा, राज्य व देश पातळीवर विविध संघटनांच्या माध्यमातून ते सतत कार्य करत आहे. ते स्वतः उच्च विद्या विभूषित असून आपल्या सामाजिक कार्याच्या जोरावर त्यांनी आगामी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची पूर्णपणे तयारी केली आहे.
Post Views: 646
