संगमनेर । झुंजार न्यूज

सोनई येथील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना ही अत्यंत निंदनीय व मानवतेला काळीमा फासणारी घटना असल्याने संगमनेर तालुक्यातील  ख्रिश्चन व दलित संघटनेच्यावतीने निषेध व्यक्त करत यातील असणार्‍या मुख्य आरोपी उत्तम बळवंता वैरागर याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सामाजिक संघटनेकडून करण्यात आली असून याबाबतचे निवेदन प्रांताना देण्यात आले .
या निवेदनात म्हटले आहे की , सदर व्यक्तींने खिश्चन धर्मीयांच्या पवित्र स्थळाची विटंबना केली असून गुन्हेगाराला कोणतीही जातपात नसते, गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. तरीपण या बाबत सखोल चौकशी करण्यात यावी. सदरचा खटला हा फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा व आरोपीला फाशीसारखी कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, सदर घटना घडत असताना ३ ते ४ व्यक्तीने त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करणाऱ्या व्यक्तीनी होत असलेली घटना थांबविण्याचा प्रयत्न केला नाही . जर घटनेला विरोध केला असता तर घटना घडली नसती यामागे त्या व्यक्तींचा काय ? उद्देश होता, याची देखील सखोल चौकशी झाली पाहीजेत. तसेच सदर व्यक्तींना आरोपी करण्यात यावे. सदर व्हिडीओ ज्यांनी व्हायरल केला, त्याचा तपास घेण्यात यावा, व त्यांना आरोपी करण्यात यावा. सदर घटनेत फिर्यादी असणाऱ्या व्यक्तीची नार्को टेस्ट करण्यात यावी, जेणेकरुन षडयंत्र करणारा. तरी सदर गुन्ह्यात खिश्चन धर्माचे दोन्ही फास्टर यांचा कुठलाही संबंध नसतांना जाणीव पुर्वक गुन्ह्यात गोवण्यात आलेले आहे. त्यामुळे याचा पारदर्शक तपास होणे गरजेचे आहे. तरी आमच्या वरील सर्व मागण्या त्वरीत मान्य करुन त्यावर त्वरीत कारवाई करण्यात यावी, अन्यथा सर्व संघटनेच्या वतीने तीव्र स्वरुपाचे रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येईल. अशा प्रकारचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आले आहे .
यावेळी रिपाई तालुकाध्यक्ष आशिष शेळके , रिपाई शहराध्यक्ष कैलास कासार , तालुका कार्याध्यक्ष विजयराव खरात , प्रा बाबा खरात , ग्रेगरी केदारी , आर व्ही पगारे , अॅड एस एस दुसिंग , अरविंद सांगळे , सुखदेव शेळके , मॅथ्यु शेळके , फॉन्सिस सोनवणे ,  सनी भगवान गायकवाड , गणेश बी भोसले , सिद्धार्थ खरात , बाळासाहेब साळवे , निलेश रोहोम , प्रशांत बागुल , मच्छिंद्र जगताप , मेंजर सुभाष ब्राहमणे , प्रमोद सोनवणे , दिपक शेळके , तालुकाध्यक्ष संदिप मोकळ , अशोक शेळके , शहनाज बेगमपुरे , एम एस दुसिंग , शिवाजी लांडगे , सिराज गायकवाड , दिलीप गायकवाड , बापुसाहेब शेळके , विकी माघाडे आदी उपस्थित होते .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *