झरेकाठी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील शिवआश्रम महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने उद्या दि. ८ मार्च २०२४ रोजी विविध कार्यक्रम करण्यात येणार असल्याची माहिती ओमसाई नागभूषण महाराज यांनी दिली
गेल्या १० वर्षापासून शिर्डी येथील सिध्द शिव योगीपिठ च्या माध्यमातून झरेकाठी येथील साई आश्रम मध्ये महाशिवरात्री मोठ्या प्रमाणात उत्सव होत असतो या आश्रमात दिवसेदिवस भक्तांची संख्या वाढताना दिसत आहे मागील वर्षी जिल्हा व जिल्हयाबाहेरुन १० हजार पेक्षा जास्त भक्त हे दर्शनाकरिता आले होते .
सकाळी ६ ते ९ वाजेच्या दरम्यान ओमसाई नागभूषण महाराज यांच्या हस्ते रुद्रअभिषेक व हवन पूजा करून सोहळा पार पाडण्यात येणार आहे. त्यानंतर महादेवाची आरती होवून सकाळ पासून दर्शन सोहळा व ७ क्विंटल शाबूदाणा , साडे सहा क्विंटल खजूर चा महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे .
