संगमनेर । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या कायम चर्चेत असलेल्या वनकमिटी अध्यक्ष सोमनाथ जोंधळे याच्यावर सरपंच आशाबाई जोंधळे व इतर नातेवाईक यानी रस्त्यावर अडवुन जिवघेणा हल्ला केला .
सविस्तर माहिती आशी की काही दिवसांपुर्वी सरपंच याचे सदस्य सह सरपंच पद रद्द केले होते त्यामुळे सरपंच याचे नातेवाईक ग्रामपंचायत कर्मचारी आशोक चौधरी याना दमदाटी केली होती याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात देण्यात आली ती तक्रार देण्याकरता वनकमिटी अध्यक्ष सोमनाथ जोंधळे हे पण सोबत होते याचा राग मनात धरून सोमनाथ जोंधळे हे 5:30 वा घरुन गावाकडे येत असताना अचानक सरपंच आशा बाई जोंधळे मदाकिनी जोंधळे हनुमंत जोंधळे संकेत जोंधळे दत्तात्रय जोंधळे विनायक जोंधळे अतुल जोंधळे यांनी दगडफेक केली संकेत जोंधळे यानी गाडी अडवून त्याच्या हातात असलेल्या फायटरने सोमनाथ जोंधळे याच्या डोक्यात वार केला परंतु वार हुकला आणि त्याच्या डोळयावर लागला दुसरा फटका त्याने नाकावर मारला इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली अतुल जोंधळे याच्याकडे तलवार होती तो हल्ला करणार तेच समोरुन नागरीक आल्याचे बघुन सर्वजण तेथुन फरार झाले त्यानंतर नागरिकांनी जखमी अवस्थेत असलेल्या अध्यक्ष यांना दवाखान्यात नेण्यात आले सोमनाथ जोंधळे यांनी उपचार घेत असताना त्याचा जबाब नोंदवून 324 ,323 ,506 ,143 ,147 ,148 गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास तालुका पोलीस स्टेशन चे पोना उगले करत आहे
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *