आश्वी | झुंजार न्यूज

देशात आज महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असताना महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी मध्यरात्रीपासूनच मंदिरात जावून दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. संगमनेर तालुक्यातील पुर्व भागातील काही गांवामध्ये महापूजा , महाआरती तसेच अनेक गावांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याचे दिसले .

याच पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील शिवआश्रम मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.साई नागभूषण महाराज यांनी अपार कष्टातून तीन एकरात उभे केलेले शिवआश्रमात भाविकांची मोठी गर्दी झाली होती सकाळी ६ वाजता महाआरती व अभिषेक झाल्यानंतर भाविकांनी महादेवाच्या दर्शनास सुरुवात केली प्रत्येक भक्त मंदिरात दर्शन घेवून साई नागभूषण महाराजाचा आशिर्वाद घेवून आश्रमातील शाबुदाना वडा , दही व खजूर या महाप्रसादाचा मनमुराद आस्वाद घेवून शिवभक्त घराकडे परतणा दिसला . ७ क्विंटल शाबुदाणा , ७ क्विंटल खंजूर , दही , केळी आदी कुठल्याही प्रकारे देणगी अथवा दान न स्विकारता महाप्रसादाचा सकाळपासून ते संध्याकाळपर्यत वाटप झाल्याचे दिसून आले  .

महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शिवआश्रमात दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर कर्नाटक राज्यातूनही भोले भक्त आले. हर हर महादेवाचा गजर करत भोले भक्त शिव आश्रमात लीन झाले. भक्ताची होणारी गर्दी बघून डॉ रंगन्नाथ गीते , संदिप महाराज सातपूते , अॅड पोपट वाणी , डॉ पोपट वाणी , संरपच अशोक वाणी , नारायण व्यवहारे , गोकूळ वाणी , सुद्दाम वाणी , आदिनाथ वाणी , डॉ शुभम वाणी , मोहीत गायकवाड , बाळासाहेब नागरे , प्रदिप मेहेत्रे , गोविंद वाणी , अविनाश मनगडे , राजू वाणी , मधुकर वाणी , गणेश प्रधान , सुहास वाणी , अनिल गोसावी , आबासाहेब वाणी , रोहीदास वाकचौरे , सुभाष गागरे , विलास वाणी , गणेश वाकचौरे , भारत वाकचौरे , काशिनाथ वाकचौरे , बापूसाहेब वाणी , जयदीप तोंडे , विठ्ठल बर्डे , गणेश पर्बत , गणेश , सुनिल  , कैलास वाणी , प्रकाश वाणी , बबन वाणी , गंगाधर वाणी , सुधीर महाराज घेवारे , रमेश गीते , मच्छिद्र गीते , जालींदर खरात , महेंद्र जाधव , डॉ शाम पाबळ , बाबादेव वाणी , मगेश जाधव आदीसह झरेश्वर मित्र मंडळ , शिवआश्रम मित्र मंडळ यांनी सहकार्य करत नियोजन केले तर सेवारूपी म्हणून आचारी भरत शर्मा यांनी विनामुल्य स्वयंपाकाचे नियोजन करत सुंदर पध्दतीने महाप्रसाद भक्तांना दिला .

चौकट
शिवरात्रीनिमित्ताने शिवआश्रमात जत्राचे स्वरुप निर्माण झाल्याचे दिसून आले लहानग्या पासून वयोवृद्ध महीला व तरुणांनी महादेवाचे दर्शन घेवून आनंदोत्सव साजरा केला .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *