आश्वी | झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर युथ फौंडेशनच्या वतीने ” महिलादिनानिमित्ताने रमाई , सावित्राबाई , जिजाऊ , अहिल्यादेवी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्यक्षम महिलांचा सन्मान करत महिलादिना साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ शुभांगी कदम ह्या होत्या
यावेळी रमाबाई,रमाई सावित्रीबाई फुले, जिजाऊ माता,अहिल्याबाई ,या कर्तृत्वान महिलांबद्दल माहिती देवून विविध अडचणीवर मात करत समाज्यासाठी कसे काम केले असे डॉ बाबासाहेब आंबेडकर युथ फौंडेशनचे सल्लागार व रिपाई संगमनेर तालुक्याचे उपअध्यक्ष बाळासाहेब कदम यांनी मार्गदर्शन केले .
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर युथ फौंडेशनचे सचिव जयभाऊ कदम , अध्यक्ष अमर कदम , स्वप्नील कदम , विजय कदम , सुनील कदम आदीसह फौंडेशनचे कार्यकर्ते व महीला उपस्थित होत्या
