संगमनेर । झुंजार न्यूज

संगमनेर येथील तिळवण तेली समाज ट्रस्ट आ230 , तिळवण तेली समाज व जय संताजी महिला मंडळ माध्यमातून वेगवेगळे विधायक असे सामाजिक कार्य करत असून नुकतेचं संगमनेर मर्चंट बँक मधील ट्रस्ट खातेचे डिजिटल दानपेटीचे उद्घाटन संगमनेर नगराध्यक्षा सौ दुर्गाताई सुधीर तांबे यांचे हस्ते करण्यात आले .

 

यावेळी डिजिटल दानपेटीचे महत्व सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की , संध्या मंदिरातून दानपेट्या चोरीच्या अनेक घटना घडताना दिसत असून डिजिटल दानपेटीमुळे आर्थिक व्यवहार हा चोख पद्धतीने होईल . तर देणगीदारांनी दिलेले दान हे सरळ ट्रस्टच्या खात्यात जमा होईल असे सांगत ट्रस्टला शुभेच्छा दिल्या . या डिजिटल दानपेटीचे उट्रघाटन करताना सौ तांबे यांनी स्वतः क्यूआर कोड द्रारे १००१ रु दान टाकल्याने ट्रस्ट अध्यक्ष सौ शारदा कर्पे यांनी दुर्गाताईचे अभिनंदन करत डिजिटल दानपेटी मुळे  मंदिरातील दानपेटीतील पैसेची चोरी होऊ शकणार नाही व दानाचे पैसे डिजिटल दानपेटीच्या माध्यमातून डायरेक्ट समाज ट्रस्ट खात्यात जमा होतील त्यामुळे चोरीचां प्रश्नच उद्भवणार नाही . 

 

ट्रस्टचे जुने ट्रस्टी दिलीप आंबेकर यांनी मंदिराची स्थापना कधी झाली आणि मंदिराचां इतिहास सांगितला तसेच ह.भ.प. बाळकृष्ण कर्पे महाराज यांनी समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या तसेच सौ कर्डिले मॅडम यांनी महिला ट्रस्टचे अभिनंदन करत म्हणाल्या की जुन्या काळी ज्या वेळी राक्षस आणि देवता मध्ये युद्ध झाले होते त्या वेळी देव हताश झाले होते आणि सर्व देव आदिशक्ती कडे गेले आणि त्या आदिशक्ती ने आपले सर्व तेज ताकद एकत्र करून दुर्गा होऊन पृथ्वी ला वाचवले तसेच समाजात राजकीय आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून दुर्गा ताई विधायक असे कार्य करत असून त्यांचा आपल्या समाजाला कायम त्या सहकार्य करत असून असेच सहकार्य कायम समाजाला असू द्यावे असे सांगितले

 

तसेच श्री माधवराव करपे यांनी महिलांना शुभेच्छा देत मला डिजिटल दानपेटी वापरता येत नाही परंतु मी 101रू देऊन दानपेटीचे उद्घाटन करत आहे . सौ शारदा करपे कडे त्यांनी लगेच रोख स्वरूपात 101रू देऊन शुभेच्छा दिल्या

 

यावेळी श्री श्यामराव वालझाडे श्री रामेश्वर करपे श्री कर्डिले माधवराव सर श्री दिपक करपे श्री दिलीप आंबेकर श्री माधवराव करपे श्री अशोक वाकचौरे श्री श्रेयश करपे श्री ह.भ.प. बाळकृष्ण कर्पे महाराज श्री दिलीप कर्डिले श्री सुरेश दुर्गुडे श्री गोरक्ष कर्पे श्री कैलास शिंदे तसेच महिला भगिनी तिळवण तेली समाज ट्रस्ट आ 230 संगमनेर अध्यक्ष सौ शारदा कर्पे सचिव सौ कांतीका वाकचौरे खजिनदार सौ अनुराधा ताई करपे विश्वस्त सौ तारकेश्वरी वालझाडे सौ रंजना शिंदे सौ अर्चना क्षीरसागर सौ सुरेखा ताई करपे सौ मोहिनी वालझाडे समजभगिनी सौ कर्डिले मॅडम सौ भारती वालझाडे सौ मीना शिंदे आदी समाज महीला व पुरुष उपस्थित होते .

 

यावेळी सर्व समाजबांधव भगिनी यांनी बार कोड डिजिटल दानपेटी चां वापर करून 2000 पेक्षा जास्त रक्कम खात्यात जमा झाली तसेच आभार प्रदर्शन करताना सौ कांतिका वाकचौरे यांनी सौ दुर्गाताई आणि सर्व समाजबांधव चे मनपूर्वक आभार मानले आणि असेच सहकार्य सर्वांनी असू द्यावे असे सांगितले .

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *