कोकणगांव । झुंजार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील कोकणगांव – शिवापूर येथे  ग्रामसभेच्या निर्णण्यानुसार मंगळवार दि . १२ मार्च २०२४ पासून आठवडे बाजार सुरु करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक एस आर वाकचौरे , ग्रामसेवक आर एन बांगर यांनी दिली .
ग्रामसभेत ग्रामस्थांनी कोकणगांव – शिवापूर हे मध्यवर्ती गाव असून संगमनेर – लोणी या राष्ट्रीय मार्गावर असणारे गांव असून संगमनेर , लोणी , आश्वी हे सर्वच आठवडे बाजार हे पंधरा ते वीस किलोमीटर वरती आहेत. परिसरातील ग्रामस्थांना आठवडी बाजारासाठी साधारणता शंभर रुपयेचा खर्च करून बाजारासाठी जावे लागते व कामधंदा बुडवून दिवसही वाया जातो तसेच काही शेतकऱ्यांना आपल्या शेतातील भाजीपाला विक्रीसाठी देखील तालुक्याच्या गावी गेल्याशिवाय पर्याय नसतो त्यामुळे जर आपल्या  गावातच आठवडे बाजार झाल्यास आजू- बाजूच्या गावातील शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना सोयीस्कर असा हा मंगळवारचा बाजार सुरु करावा अशी ग्रामसभेत चर्चा झाली.या सर्वच गोष्टीचा विचार करून प्रशासक एस आर वाकचौरे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने मंगळवारचा बाजार करण्याचे ठरले 
तर परिसरातील गावात कोकणगांव येथे मंगळवारी बाजार भरणार आहे अशा प्रकारचे प्रचार प्रसार करण्यात आला या गोष्टीचा सर्व स्तरातून विचार होऊन पहिल्याच बाजारात पन्नास ते साठ च्या आसपास दुकाने लागतील असा विश्वास व्यक्त होत आहे .
तरी भाजीपाला, फळे, कपडे,किराणा अशा सगळ्याच प्रकारचे दुकानदारांनी आपली दुकाने मंगळवार या दिवशी घेवून यावे व यांचा लाभ परिसरातील शेतकरी , महिला व ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन ग्रामपचयातीच्या माध्यमातून करण्यात आले आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *