कोपरगाव । झुंजार न्यूज

 

राष्ट्रीय चर्मकार महासंघ महिला आघाडी च्या वतीने कोपरगाव येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रक्तदान शिबीर व महिलांकरिता विविध क्रीडा व सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अत्यंत सुनियोजित अशा कार्यक्रमाचे आयोजन राज्यकार्यकारणी सदस्या सौ स्नेहा दिलीप कानडे, महिला शहर अध्यक्ष सौ जयश्री गणेश कानडे यांनी केले होते

 

राष्ट्रीय चर्मकार महासंघ संस्थापक अध्यक्ष माजी समाज कल्याणमंत्री बबनरावजी घोलप नाना व राष्ट्रीय महिला अध्यक्षा सरोज बीसुरे यांच्या आदेशाने उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप कानडे, जिल्हाध्यक्ष अशोकराव कानडे, शहरअध्यक्ष गणेश कानडे यांच्या मार्गदर्शना खाली यशस्वीरित्या पार पडले

 

राष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून शहर चर्मकार महिला आघाडी आणि एसजेएस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिलादिना निमित्त रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले अनेक राक्तदात्यानी रक्तदान केले
महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमा बरोबरच विविध स्पर्धा झाल्या त्यामध्ये एका सेकंदात बकेट मध्ये जास्त बॉल टाकणे एका मिनिटात जास्त टिकली चिकटवने ,चमचा बॉल, फुगे फुगविणे तसेच उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ कुपनद्वारे विविध बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते होममिनीस्टर स्पर्धा यामध्ये विजेत्या महिलांना पैठणीसाडी देण्यात आली. उपस्थितांसाठी अल्पोपहाराचीही उत्तम व्यवस्था केली होती. सदर कार्यक्रमास समाजातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला तसेच बांधवांनी रक्तदान करुन आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हा संदेश दिला राष्ट्रीय चर्मकार महासंघ महिला आघाडी ने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे या वेळी झालेल्या कार्यक्रमाचे सुत्र संचालन वंदना झरेकर यांनी केले.

 

याप्रसंगी जेष्ठ पदाधिकारी एम डी कानडे, संजय पोटे, तालुका अध्यक्ष माधवराव पोटे, युवा जिल्हाध्यक्ष दत्ता दुशिंग, संतोष शिंदे, भाऊसाहेब कानडे, माधव पोटेमेजर, संकेत दिलीप कानडे, संकेत अनिल कानडे, गणेश आण्णासाहेब कानडे, प्रमोद भोसले, डॉ अशोक गावीत्रे, ग्रामसेवक बागले भाऊसाहेब, रघुनाथ लोहकरे, कचरू लोहकरे, शंकर कडू, जगन कानडे, मनोज कानडे, भैय्या कानडे, तेजस विजय अहिरे, ओम कानडे तसेच महिला आघाडीच्या शोभा कानडे, शोभा पोटे, चंद्रकला कानडे, सविता पोटे, लिला पोटे, कविता गाढे, उषा लोहकरे, सुमन सातपुते, संगीता कानडे, सोनाली कानडे, सुलेखा पोटे, अर्चना कानडे, प्रतिभा भोसले, राणी सातपुते, समुन सातपुते, सुनिता कानडे, मोनिका दुशिंग, सरला पोटे, धनश्री पाठक, नलिनी विठ्ठल तुपे, सायली तुपे, कविता गाडे, प्राजक्ता गाडे, अनुराधा कानडे, निलम अशोक गायत्रे, पुजा जाधव, सुमन साटवते, प्रतिक्षा गाढे, स्वाती सातपुते, पुनम चोळके, ऋतुजा कानडे, साईश्री कानडे, साईश्री पोटे, अक्षरा कानडे, श्रृतिका कानडे, यांचे सह एस जे एस हॉस्पिटल टीम तसेच पदाधिकारी व समाज बांधव व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed