आश्वी | झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील प्रती शनीशिंगणापुर म्हणुन प्रसिद्ध असलेल्या प्रतापपूर येथील मानमोडे बाबा शनी मंदिरात श्री शैनेश्वर महाराज वर्धापन दिनानिमित्त किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रवरा उजव्या कालव्यालगत निसर्ग रम्य वातावरणात असलेल्या प्रती शनीशिंगणापुर म्हणुन प्रसिद्ध असलेल्या मानमोडे बाबा शनीमंदिरात श्री.शैनेश्वर महाराज वर्धापन दिनानिमित्त मंगळवार दिनांक १२ मार्च पासुन सकाळी ८ते१० शैनेश्वर महाराज पारायण वाचन,६ते७हारीपाठ,७.३०ते ९.३० हारीकिरतन व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .
मंगळवार दिनांक १२ मार्च रोजी ह भ प शंकर महाराज शिंदे मुरबाड, बुधवार दिनांक १३रोजी ह भ प दिपक महाजन देशमुख, ह भ प बाळासाहेब महाराज रांजळे सरलाबेट,ह भ प अनंत महाराज काळे , हभप तुकाराम महाराज मुढे बीड ,ह भ प जालिंदर महाराज नरवडे अहमदनगर, हभप नवनाथ महाराज म्हस्के बाभळेश्वर, तर मंगळवार दिनांक १९ मार्च रोजी हभप गुरूवर्य रामगिरी महाराज सरलाबेट यांचे काल्याचे किर्तन होईल .
