संगमनेर । झुंजार न्यूज
सहकारासाठी दीपस्तंभ असलेल्या अमृत उद्योग समूहाचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या 14 व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवार दिनांक 14 मार्च 2024 रोजी सकाळी 7 वा. अमृतेश्वर मंदिराजवळील प्रेरणास्थळ येथे काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत अभिवादन व पुष्पांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांनी दिली आहे.
स्वातंत्र्यसंग्रामानंतर सहकाराच्या माध्यमातून गोरगरीब माणसांच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण करताना स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारात आर्थिक शिस्त, पारदर्शकता, काटकसर, व आधुनिकता ही तत्वे रुजवली. याच रचनात्मक वाटचालीवर विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत उद्योग समूह काम करत आहेत. गुरुवार दिनांक 14 मार्च 2024 रोजी 14 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अमृत उद्योग समूहाच्या वतीने अमृतेश्वर मंदिराजवळील प्रेरणास्थळ येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना सकाळी 7 वा. पुष्पांजली व आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.
याप्रसंगी आमदार सत्यजित तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव पा. खेमनर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे ,सौ.दुर्गाताई तांबे, सौ.कांचनताई थोरात, रणजीतसिंह देशमुख, शंकरराव पा. खेमनर, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, इंद्रजीत भाऊ थोरात, लक्ष्मणराव कुटे, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे,राजेंद्र कडलग, राजेंद्र गुंजाळ ,सौ.सुनंदाताई जोर्वेकर, सौ.अर्चनाताई बालोडे, सौ.निर्मलाताई गुंजाळ, मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे ,सिताराम राऊत, नवनाथ आरगडे, निखिल पापडेजा, प्रा.बाबा खरात, प्राचार्य केशवराव जाधव, सुरेश झावरे, जावेद शेख यांचे सर्व जिल्हा परिषद सदस्य ,पंचायत समिती सदस्य व अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या अभिवादन कार्यक्रमासाठी तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अमृत उद्योग समूह, कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे
