साकुर । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील साकूर येथील अल्पवयीन मुली सोबत घडलेल्या घटनेबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने “सु-मोटो” दखल घेत जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाला लवकरात-लवकर पाठवण्याचे निर्देश दिलेले आहेत.
साकुर येथे महाराष्ट्र राज्य महिला सदस्य उत्कषा रुपवते यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. पोलीस प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप पिढीतेच्या कुटुंबीयांनी केला असता त्याबाबत घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. खेडेकर यांना पुढील प्रक्रियेसाठी काही सूचना केल्या. सामाजिक कार्यकर्त्या डॉ. जयश्री थोरात यांच्या समवेत संगमनेर येथे DYSP सोमनाथ वाघचौरे यांची भेट घेऊन तपास योग्य रीतीने होऊन आरोपींना कडक शिक्षा होण्यासाठी ठोस पावलं व तालुक्यामध्ये पुढे अशा घटना घडू नये यासाठी पोलिसांची वाढीव गस्त, जलद कार्यवाही व इतर बाबींवर सूचना केल्या.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed