आश्वी । झुंजार न्यूज

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले) व एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने विविध मागण्याकरिता मंगळवार दि. १९ मार्च २०२४ रोजी  निमगांव जाळी या ठिकाणी कोल्हार-घोटी हायवे महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचा प्रशासनास इशारा दिला होता मात्र लोकसभेच्या निवडणुकीच्या आचार सहिंतेमुळे अनुचित प्रकार घडू नये म्हणून आश्वी पोलिस स्टेशनचे पो नि सोनवणे यांच्या मध्यस्थीने व केलेल्या मागण्या लेखी आश्वासनांने रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती रिपाई तालुकाध्यक्ष आशिष शेळके व एकलव्य संघटना तालुकाध्यक्ष अनिल बर्डे यांनी दिली 

रस्ता रोको आंदोलनच्या निवेदनात १) महाराष्ट्र सरकारने शेतकरी दुध उत्पादकांसाठी जे काही अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. त्या संदर्भात उत्पादकांना ज्या काही अटी शर्ती घातलेल्या आहेत त्या अत्यंत त्रासदायक व किचकट आहेत. त्यामुळे घालून दिलेल्या अटी व शर्ती शितील करुन अनुदान त्वरीत शेतक-यांच्या खात्यात जमा करावे. २) संगमनेर तालुक्यात, शहरात तसेच घारगांव व आश्वी पोलीस स्टेशनच्या हददीत सुरु असलेले अवैध धंदे त्यांमध्ये मटका, जुगार, गुटखा, वाळू, दारु, गांजा, बेकायदेशीर हॉटेल, अवैध प्रवासी वाहतूक तसेच परवानाधारक देशी दारुच्या दुकानातुन होत असलेली बॉक्स विक्री, वाळु डेपोच्या नावाखाली चालु असलेली अवैध वाळू वाहतूक, मुरुम वाहतूक त्वरीत बंद करण्यात यावी. ३) शासन आपल्या दारी या उपक्रमामधून अनेक गरजु अनुसुचित जाती व जमाती तसेच इतर लोक रेशन कार्ड, आधारकार्ड, ७/१२ नोंदी, जातीचे दाखले, संजय गांधी निराधार योजने अंतर्गत मिळणारे लाभ, स्मशानभुमीच्या जागेचे प्रश्न या संदर्भात वंचित राहिलेल्या लोकांसाठी प्रत्येक गावी शिबीर आयोजीत करुन त्यांच्या समस्या सोडविण्यात याव्या. ४) संगमनेर तालुक्यातील सुशीक्षीत व्यावसायिक तसेच शेतक-यांना महामंडळाकडून तसेच शासकीय बँकेकडून त्वरीत कर्ज विरतण करण्यात यावे. तसेच मुद्रालोण संदर्भात कोणत्याही जाचक अटी लावण्यात येवू नये व लाभार्थ्यांना कर्ज वितरण करण्यात यावे. ५) शैक्षणिक फी संदर्भात विदयार्थ्यांना कोणत्याही प्रकारे त्रास देण्यात येऊ नये, परिक्षेसाठी प्रत्येक विदयार्थीला बसु दयावे. फीच्या नावाखाली जर कोणती संस्था किंवा शिक्षक त्रास देत असेल तर त्यांचेवर कारवाई करण्यात यावी. ६) विज वितरण कंपनीकडून शेतीसाठी लागणारी विज सुरळीत ठेवण्यात यावी. विजेचा टाईम दिवसा असला पाहीजे जेणेकरुन वाघासारख्या हिसंक प्राण्यांपासुन त्रास होणार नाही. तसेच विज उत्पादकाचे विज कनेक्शन बिलासाठी काढण्यात येवू नये. या मागण्या केल्या होत्या . मात्र २०२४ लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्याने आचार सहिंता लागू झाली . यात कुठलाही त्रास निर्माण होवू नये म्हणून आश्वी पोलिस स्टेशनच्या पो नि सोनवणे यांनी शेळके व बर्डे यांच्यासह कार्यकर्त्याशी चर्चा करुन तुम्ही उपस्थितीत केलेल्या मागण्या ह्या मंजूर करण्याचा प्रयत्न करु मात्र रस्ता रोको आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती करत लेखी आश्वासन दिल्याने रस्ता रोको स्थगित करण्यात आला .

यावेळी विजय खरात , कैलास कासार , योगेश मुत्तोडे , बाळासाहेब कदम , अमोल राखपसरे ,जनार्धन साळवे ,अनिल मोरे , कृष्ण झरेकर , अनिकेत खरात , गौतम वर्पे , मधुकर सोनवणे , सि‌द्धार्थ खरात , अजित रोकडे , बाळू पवार ,विजय मुन्तोंडे ,अजय भोसले , नाना कदम , रमेश भोसले , संपत भोसले , विजय कदम , स्वप्नील कदम , भारत गायकवाड , मंदाताई पवार , योगेश खरात , सुभाष रोकडे , विजय खेमनर , सि‌द्धार्थ खरात , राधु वाघमारे , भाऊसाहेब सुर्यवंशी , नवनाथ सुर्यवंशी , मारुती पवार , शंशीकांत रोकडे ,दिपक खरात, विकास गायकवाड , गणेश माळी ,योव्हान मिसाळ ,अविनाश सोनवणे , नाना जगताप , आत्माराम जगताप , रवि रोकडे , शरद जमधडे , सागर माळी भारत जमा , आत्माराम भेडामळे सोनु बेगमपुरे , गोपीनाथ गायकवाड विराज मोरे , दादासाहेब रोकडे ,दिपक अडागळे , योगेश कर्डक , जॉन म्हंकाळे , गोविंद सोनवणे , गणेश मोरे , आमोल हेकाळे  , धीरज बर्डे , मच्छिंद्र मोरे , गणेश पवार , सिताराम मोरे , उत्तम जाधव , भगवान गोलवड , शिवाजी नागरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.  
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed