शिर्डी । झुंजार न्यूज

 

२०२४ लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत, ही निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्ष आपापल्या पातळ्यांवर प्रयत्न करीत आहेत. केद्रातील सत्ता टिकविण्यासाठी विरोधकांना नमविण्याची रणनीती, संभाव्य अर्थात, तगड्या उमेदवारांची चाचपणी आणि पक्षातर्गंत वादाचे आव्हान मोडून भाजपा , कॉग्रेस , शिवसेना दोन गट , राष्ट्रवादी कॉंग्रेस दोन गट , रिपाई , वंचित आदीसह विविध पक्ष निवडणुकीला सामोरे जाणार आहे मात्र यात सुशिक्षित तरुणांनाचा अभाव दिसून येत असून बौद्ध समाज्याला कोठे ही स्थान दिसत नसल्याची खंत अॅड अविनाश कैलास शेजवळ यांनी व्यक्त केली .

 

 

अॅड शेजवळ पुढे म्हणाले की , महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागां असून या ४८ जागावर विजयी मिळविण्याकरिता विविध राजकिय पक्षांनी कंबर कसली आहे . यात शिर्डी लोकसभा मतदारसंघ असून हा मतदारसंघ अनुसूचित जातीकरिता राखीव असल्याने २००९ पासून एकाचं समाज्याला प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे . शिर्डी मतदार संघातून भाऊसाहेब वाकचौरे हे २००९ ला शिवसेनेकडून विजयी झाले . मात्र राजकिय क्षितीज्यावर कोणाला कोठे जायचे बंधन नसल्याने वाकचौरे यांनी २०१४ कॉग्रेस कडून निवडणुक लढविली मात्र १५ दिवसात आलेले लोखंडे यांनी बाजी मारली ते आजपर्यत मात्र राजकिय प्रवाहात गट बाजी निर्माण होवून शिवसेना , राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने राज्यात राजकारणाची खिचडी झाली . त्यामुळे इच्छुकांची मनधरणी करण्यात संध्या पक्षाचे जेष्ठ नेते दिसत आहे . शिर्डी मधील खासदार असणारे लोखंडे हे शिवसेनेच्या शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटात वाकचौरे दाखल झाले तर काही दिवसात शिदे गटात श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे दाखल झाल्याने उमेदवारीकरिता स्पर्धा निर्माण झाल्या त्यात मनसे सुद्धा युती आल्याने त्यांनी ही शिर्डीची जागा युतीकडे मागितली .

 

 

यात असे दिसते की काना मागून आले आणि तिखंट झाले . १४ वर्षापासून रिपाई पक्ष हा युती बरोबर असल्याने रामदास आठवले यांना शिर्डीतून जागा द्या ही मागणी वेळोवेळी होवून सुद्धा वरिष्ठांकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे . शिर्डी मतदार संघात बौद्धांची मोठी संख्या असल्याने या समाज्याला प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार नसल्याचे संध्यातरी चित्र दिसत आहे .

 

 

गेल्या अनेक वर्षापासून शिर्डी मतदार संघात अनेक समस्यामधून बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे केवळ मोदीचा चेहरा पाहून जर निवडणुका होत असेल तर त्या मतदार संघाचा सर्वागीण विकास होणे ही महत्वाचे आहे मात्र तसे दिसले नाही काही ग्रामिण भागात खासदार कोण आहे हेचं माहित नाही . तर निवडणुकामधून तेचं ते चेहरे उमेदवारीकरिता चमकले जात आहे तेव्हा सर्वसामान्य , सुशिक्षीत , तरुणांना संधी कधी मिळणार हे पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे .

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *