संगमनेर तालुक्यातील मांचीहिल संस्थानातील चैतन्य श्री कानिफनाथ महाराज यांचा भव्य यात्रोत्सव समारंभ शनिवार दि ३० मार्च २०२४ रोजी काव्य संमेलन व किर्तनरूपी सोहळ्याने संपन्न होत असल्याची माहिती मांचीहिल संस्थान आयोजकांनी दिली आहे
मांचीहिल येथील चैतन्य श्री कानिफनाथ महाराज देवस्थान हे नवसाला पावणारे, मनातील इच्छा पूर्ण करणारे व सदैव संकटामध्ये आपल्यावर आशीर्वाद ठेवणारे देवस्थान असल्याने सालाबादप्रमाणे मांचीहिल संस्थानच्यावतीने सोलापूर येथील ख्यातनाम कवियित्री विमलताई माळी यांच्या उपस्थितीत सकाळी ५ ते १० या वेळेत काव्य संमेलन होईल तर सकाळी १०.०० वा. ह.भ.प. महंत गुरुवर्य प्रमोदजी महाराज जगताप ( बारामतीकर ) यांच्या कीर्तनरूपी सेवेनेसह दर्शन सोहळा यात्रा उत्सव संपन्न होईल तसेच सर्व भक्तांकरिता महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.
तरी मांचीहिल , आश्वी परिसरासह सर्व भाविकांनी चैतन्य श्री कानिफनाथ यात्रा उत्सावाचा लाभ घ्यावा असे आवाहन मांचीहिल संस्थाननी केले आहे .