आश्वी । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी अजमपुर गावातील गरिब दुध उत्पादक शेतकरी संदिप भाऊसाहेब गिते यांच्या ४ दुधाळ गाया व नामदेव भिकाजी आव्हाड यांची १ गाय अशा ५ गाया गुरुवार दि २८ रोजी दुपारी ११ वा विचित्र आजाराने मृत्यु झाल्याने परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली असुन ऐन उन्हाळ्यामध्ये पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेल्या गाया व लाखो रुपयेचे नुकसान झाल्यामुळे गरिब शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले असुन या गायांचा मृर्त्य नेमका कशामुळे झाला ही विचित्र साथ नेमक कोणती याचा उलगडा होऊन या गरिब शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व भाजपा जिल्हा सरचिरणीस भारतराव गिते यांनी केली आहे .
या घटनेची माहिती मिळताच सरपंच सौ संगिता गिते व उपसरपंच श्री बाजीराव गिते यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने पशुवैदकिय अधिकारी शिवाजी फड यांच्याशी संपर्क करून घटनेची माहिती दिली तातडीने आश्वी येथील डॉ तांबे या पशुवैदकिय आधिकांऱ्यांनी येऊन पोस्टमार्टम करून अहवाल पुणे येथे पाठवला रिपोर्ट येई पर्यन्त नेमक हि साथ कोणती याबाबत शेतकऱ्यामध्ये घबराट पसरली आहे . 
या घटनेने शेतकऱ्यांचे ५ लाख रुपयेचे नुकसान झाले आहे एकिकडे दुधाला भाव नाही . ऐन उन्हाळ्यात चारा नाही पशुखाद्याचे भाव गगणाला भिडले त्यामुळे शेतकरी व दुध उत्पादक मरतयातना सहन करित आहे . सध्या दुध धंदा मोडकळीस आला आहे पशुधनासाठी चाऱ्याचे भाव गगणाला भिडले आहे . दुष्काळात तेरावा सध्या खर कुताच्या आजाराने दुध उत्पादकाचे गोठे बसले महागडी औषधे , डॉक्टर यामुळे बळीराजा वैतागला आहे 
तरी संबंधीतांनी हा विचित्र साथीचे आजारावर शंशोधन करून शाशनामार्फत साथीच्या आजारावर मोफत वैद्यकिय सेवा देऊन शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी सरपंच सौ संगिता भारतराव गिते उपसरपंच बाजीराव गिते यांच्यासह ग्रा प सदस्यांनी केली आहे . याबाबत शेतकऱ्यांचे शिष्ट्रमंडळ महसुलमंत्री ना राधाकृष्ण विखे पा यांना लवकरचं भेटणार आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *