देवराली प्रवरा : झुंजार न्यूज
संध्या वातावरण फार विद्रुप झाले असून जाती – जाती मध्ये अंतर वाढत असल्याने येणारा काळ कठिण बनेल त्याकरिता मुलांना चांगले शिकवून चांगले संस्कार दया तरचं समाज्यात परिवर्तन घडेल असे आवाहन विठ्ठल कांगने यांनी केले .

राहुरी तालुक्यातील देवराळी येथे रिपाई जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या अभिष्टचिंतन प्रसंगी ते बोलत होते .

विठ्ठल कांगने पुढे म्हणाले की , समाज्यात ज्या व्यक्तीचे कार्य सामाजिक दायित्व असते त्यांचा वाढदिवस लोकचं साजरे करतात . तरुणांनी चांगल्या लोकांच्या मागे राहू समाज्या परिवर्तनासाठी लढा तर भवितव्य आहे . संध्या देशात ” धर्मात जात ‘ जातीत जात त्यामुळेचं माझा भारत मातीत ” घडून देवू नका ! तर आंबेडकर जयंतीला धांगड धिंगाणा करण्या पेक्षा संविधान हातात घ्या व बाबासाहेबांचे चरण स्पर्श करा . तर मुला – मुलीने परिस्थिती बघून चांगले वैचारिक ज्ञान संस्कार घ्या किर्तने – भाषणे ऐकून जीवन घडत नाही तर त्यास चांगले शिकावे लागते तर गाड्या – मोबाईलच्या नादी लागू नका येणारा काळ फार कठिण आहे तेव्हा आई – वडीलांनी आपल्या लेकरावर लक्ष्य ठेवावे . तर सार्वजनिक कार्यक्रमातून शिकलेल्या मुलांचा सन्मान व्हावा म्हणजे दुसऱ्या ही मुलांला चालना मिळते .

यावेळी रिपाई प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव , जेष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड , राज्य सचिव दिपकराव गायकवाड , एकलव्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे , उदयोजक गणेश भांड , जिल्हा युवा अध्यक्ष पप्पू बनसोडे , रमेश शिरकांडे , आशिष शेळके , राजेंद्र गवांदे , योगेश मुन्तोंडे , सुभाष त्रिभुवन , पत्रकार राजेश गायकवाड आदीसह मोठ्या संख्येने जिल्ह्यातुन विविध पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते .

यावेळी सुरेंद्र थोरात यांची युवकांनी वाजत- गाजत संपूर्ण गावांत मिरवणुक काढली . तर एका युवकाने आपल्या रक्ताने सुरेंद्र थोरात यांचे चित्र काढून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असे हजारो युवकांनी शुभेंच्छा वर्षाव केला .

