पानोडी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे युवकांच्या पुढाकारातून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

यावेळी गावातील संरपच , उपसंरपच , ग्रामसेवक , कर्मचारी व कार्यकर्त्यानी ग्रामपचायत कार्यालयात प्रथम डॉ आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तर गावातील जुन्या ग्रामपचायत कार्यालयासमोरील स्मारकांच्या जागेत डॉ बाबासाहेब आंबेडकर युथ फाऊंडेशनच्या वतीने दहा बाय वीसचा डिजिटल बॅनर बनवून बनविलेल्या स्टेजवर सर्व महापुरुषांच्या प्रतिमा ठेवला तर उभारण्यात आलेल्या झेंड्याच्या भोवती रंगीबेरंगी फुलांनी सजविण्यात आल्याने एक आकर्षकतापणा येथे आल्याचे दिसले मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांना फुलहार घालून अभिवादन करण्यात आले तर मानवंदना देण्यात आली

यावेळी संरपच गणपत हजारे , ग्रामसेवक सुरेंद्र ब्राह्यणे , माजी उपसंरपच अशोक तळेकर , रिपाई तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब कदम , माजी पोलिस आधिकारी भाऊसाहेब चव्हाण , रावसाहेब घुगे , रंगन्नाथ मुंढे , नानासाहेब कदम , भारत शेवाळे , संतोष सांगळे , जीवन कदम , मधुकर कदम , भावका कदम , राजेंद्र कदम , गणेश कदम , यश कदम , अमर कदम , सुनिल कदम , प्रकाश कदम , रामभाऊ कदम , पत्रकार राजेश गायकवाड आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .

