आश्वी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील बालपण इग्लीश स्कूलच्या इयत्ता सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी पारेगाव येथील IT कंपनीला भेट देऊन आयटी क्षेत्रात होणाऱ्या क्रांती बद्दल माहिती घेत विद्यार्थी शिकत असलेल्या कोर्स बद्दल माहिती घेतली.

आयटी क्षेत्रात होणारे बदल व आयटीचे भविष्य याविषयी सखोल मार्गदर्शन कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट दीपक नागरे यांनी दिले. आयटी क्षेत्रात करिअर करण्याच्या संधी कशा पद्धतीने उपलब्ध होत आहे याविषयी मार्गदर्शन केले.

बालपणच्या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे अतिशय मुद्देसूद असे उत्तरे दिपक नागरे यांनी दिले. पारेगाव सारख्या उजाड माळरानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सॉफ्टवेअरचे ज्ञान देण्याचे काम ही कंपनी करत आहे ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय भूषणावह आहे. बाप कंपनीचे संस्थापक रावसाहेब घुगे यांनीही विद्यार्थ्यांची संवाद साधत बाप कंपनी विषयी मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर कशाप्रकारे तयार केले जाते याविषयी सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी इतरही क्षेत्रात करियर कसे करायचे याबद्दल त्यांनी माहिती घेतली. विद्यार्थी जवळजवळ दोन तास त्यांना प्रश्न विचारत होते. व प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडून घेत होते. बालपणच्या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांचे कंपनीचे उपाध्यक्ष व कंपनीचे अध्यक्ष यांनी विशेष करून कौतुक केले. असे विद्यार्थी जर तुमच्या शाळेत असतील तर शाळा नेहमीच प्रगतीपथावर जाईल. असे ते बोलू लागले. विद्यार्थ्यांनी खरोखरच या फील्ड व्हिजिट चा खूप आनंद घेतला. कंपनी जरी डोंगराळ भागात असेल तरी तेथे गेल्यावर खूप प्रसन्न वातावरण वाटले. व या व्हिजिटचा विद्यार्थ्यांनी खरोखरच आनंद लुटला. नऊ ते तीन वाजेपर्यंत वेळ कसा गेला हे विद्यार्थ्यांना कळले नाही.
या उपक्रमासाठी बालपण स्कूलच्या अध्यक्षा सौ सोनाली मुंढे यांनी ध्येयवादी विचार ठेवून या उपक्रमाचे आयोजन केले.
