शिर्डी । झुंजार न्यूज
केंद्रीय मंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या उपस्थितीत शुक्रवार दि १० मे २०२४ रोजी शिर्डी व नगर येथील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ” कार्यकर्ता मेळावा ” आयोजित करण्यात आले असल्याची माहिती रिपाई राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी दिली .
शिर्डी लोकसभेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ रामदास आठवले यांच्या उपस्थितीत शिर्डी येथील हॉटेल साई गोल्ड येथे दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद व ४ वाजता ” कार्यकर्ता मेळावा ” होणार असून अहमदनगर येथे महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ नगर येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे .

तरी शिर्डी , नगर लोकसभा मतदारसंघातील सर्व रिपाई कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विजयराव वाकचौरे , श्रीकांत भालेराव , सुरेंद्र थोरात , राजाभाऊ कापसे , दिपकराव गायकवाड , भिमा बागुल , पप्पू बनसोडे, अंकुश भैलुमें , सुनिल साळवे यांनी केले आहे

