कर्जत । झुंजार न्यूज
लोकसभा मतदारसंघातील भाजप-आर.पी.आय-शिवसेना- राष्ट्रवादी-मनसे- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले उद्या (शुक्रवार १० मे) कोंड्या मामा चौक,मंगलगेट अहमदनगर येथे जाहीर सभा सायं ६ वा. होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली .
या सभेला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,शिवसेना संपर्क प्रमुख नगरसेवक सचिन जाधव,शिवसेना जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले,अहमदनगर संपर्क प्रमुख श्रिकांत भालेराव,राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे,राज्य सचिव राजाभाऊ कापसे,राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड , सुरेंद्र थोरात महायुतीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख जिल्हा पदाधिकारी,तालुकाध्यक्ष पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.
ना. रामदास आठवले यांच्या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुश अण्णा भैलुमे, रिपब्लिक पार्टी ऑफ जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कदम, तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी कोपर्डी येथील दलित हत्या प्रकरणाविषयी नामदार रामदास आठवले हे कुटुबांला भेट देणार आहे, अंकुश अण्णा भैलुमे, दत्ता कदम, विशाल काकडे, कुंडलिक गंगावणे, सतीश भैलुमे, बळीराम कांबळे, सतीश आल्हाट, विष्णू चव्हाण, अविनाश चव्हाण, रोहन कदम, कुंदन भैलुमे, अमोल देवळे, संकेत घोडके, मल्हारी कांबळे हे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
