कोपरगांव । झुंजार न्यूज
शिर्डी लोकसभाचे मतदान जवळ येत चालेल आहे तसा प्रचारात गती मिळत आहे विरोधक एकमेकांवर टीका करत आहे विकासाच्या मुद्दा केवळ निवडणुकीपुरताच त्याचा वापर करताना दिसत आहे

कोपरगाव शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभेच्या अधिकृत उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी सांगितले आहे की प्रेशर कुकरच्या शिटीने विरोधी उमेदवारांना घाम फुटत आहे

शिर्डी लोकसभेचा कुठलाही विकास झालेला नाही एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप एवढाच विकास झाल्याचे सांगितले माझ्या पाठीमागे जनता जनार्दन असल्यामुळे माझा विजय निश्चित असेही रूपवते त्यांनी म्हटले विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्यामुळे अनेक गावात माझ्या प्रचाराचे पोस्टर फाडले जात आहेत तसेच माझ्या गाडीवर अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक सुद्धा केली जात आहे लोकशाहीमध्ये अतिशय निंदनीय गोष्ट आहे गृहमंत्री प्रचारासाठी शिर्डीत येतात पण माझ्यावर झालेला हल्ला विषयी ब्रश शब्द काढत नाहीत असे रूपवते यांनी सांगितले

शिर्डी लोकसभेसाठी माझ्याकडे व्हिजन आहे आणि त्यानुसार मी काम करणार असल्याच शेवटी सांगितले
