आश्वी । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील श्री संत जनार्दन स्वामी विद्यालयाचा एस. एस .सी. बोर्ड परीक्षा निकाल  इयत्ता दहावीचा शेकडा निकाल  १००%लागला असून या  १००टक्के नेत्रदीपक निकालाचे हे सलग पाचवे वर्ष आहे. अशी माहिती प्राचार्य श्रीकांत माघाडे यांनी दिली.
        
सर्व यशस्वी विद्यार्थी ग्रामीण  भागातील असून यादृष्टीने हा निकाल संपूर्ण तालुक्यात अत्यंत उत्कृष्ट ठरला आहे. मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब, सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज या संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ.सुधीरजी तांबे साहेब, आमदार सत्यजित तांबे साहेब, राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख साहेब, सह्याद्री संस्थेचे सेक्रेटरी लक्ष्मणराव कुटे,  संगमनेर तालुका युवा काँग्रेसचे  अध्यक्षा व एकविरा फाउंडेशनचे संस्थापक डॉ. जयश्री ताई थोरात, सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात , सह सेक्रेटरी चासकर सर,संस्थेचे रजिस्टार गवांदे सर ,स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष शिवाजीराव खुळे पाटील, सर्व स्कूल कमिटी संचालक, प्राचार्य श्रीकांत माघाडे, सर्व प्राध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ यांच्यावतीने सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. 
निकाल सारांशामध्ये 27 विद्यार्थी-विद्यार्थीनींनी विशेष गुणवत्ता मिळवली असून ३ विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. प्रथम पाच विद्यार्थी पुढीलप्रमाणे असून कोल्हे आर्या संजय  हिने 92.20 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. तसेच मोरे सिद्धी मंगेश व  कोल्हे ज्ञानेश्वरी एकनाथ या दोघींनी 91.20 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला.दिघे नील जिजाभाऊ याने 89.80 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला असून  खुळे श्रावणी बाळासाहेब हिने 88.00 मिळवून चतुर्थ क्रमांक तर कोल्हे कावेरी किशोर व कोल्हे शर्वरी कैलास या दोघींनी 87.60 टक्के गुण मिळवून पंचम क्रमांक  पटकावला .
या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक आप्पासाहेब तुरकणे, अशोक गुंजाळ, कृष्णा काशीद, सदुकर थोरात, रामदास भालेराव, कमल थोरात यांचे स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन शिवाजीराव खुळे पाटील, भास्करराव खुळे सर,अशोक सातपुते, नानासाहेब कोल्हे,शंकर शिंदे, शहाबाई गाडे, फिलोमिना भालेराव, अरुण वामन, हर्षद कोल्हे प्रतीक्षा लांडगे, उज्वला कोल्हे, बाळासाहेब गायकवाड , बाळासाहेब नवले,सुनील यादव नरेंद्र गायकवाड यांनी अभिनंदन केले.सर्व ग्रामस्थांनी निकालाबाबत समाधान व्यक्त केले.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *