आश्वी । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील आश्वी बु ॥ येथील रयत शिक्षण संस्थेचे अश्वि इंग्लिश स्कूलचा एस. एस. सी. परीक्षा मार्च – 2024 96.66 % निकाल लागला .
या एस एस सी परीक्षेला 90 विद्यार्थी बसले होते पैकी 87 विद्यार्थी पास झाले विशेष प्राविण्य – 49 , प्रथम श्रेणी – 27 , द्वितीय श्रेणी – 9 , पास श्रेणी – 2
विद्यालयातील प्रथम तीन विद्यार्थी पुढील प्रमाणे प्रथम क्र.- शिंदे अनुष्का दिलिप – 94.40 % (472/500) ,   द्वितीय क्र.- आंधळे श्रावणी सतिश – 94.20 % (471 / 500) , तृतीय क्र – जाधव तेजस्विनी बाळासाहेब – 94.00 % (470 / 500) विद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन अश्वि इंग्लिश स्कूल अश्वी विद्यालयाचे मा. प्राचार्य जे आर बर्डे सर, पर्यवेक्षिका लोखंडे मॅडम, स्थानिक स्कूल कमिटी, शिक्षक पालक संघ, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समितीतील सर्व सदस्य यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *