विधानसभा निवडणुकीत महायुती च्या महाविजयाचा केला निर्धार !

 

मुंबई । झुंजार न्यूज 

 

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नविदिल्लीतील सफदर जंग रोड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या महाविजयाचा निर्धार या यावेळी उभय नेत्यांनी केला.यावेळी उमुख्यमंत्री ना श्री देवेंद्र फडणवीस यांचा आठवले कुटुंबीयांनी सहर्ष स्वागत केले.यावेळी ना. रामदास आठवले यांच्या पत्नी सौ सीमाताई आठवले; पुत्र जित आठवले आणि रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडी चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पप्पू कागदे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी संविधान बदलण्याचा समाजात फूट पाडणारा
विषारी प्रचार केला होता.मात्र तो आरोप खोडून काढण्यात ना.रामदास आठवले आणि रिपब्लिकन कार्यकर्त्यांना मोठे यश आले.रिपब्लिकन पक्षाने दिलेल्या खंबीर साथी मुळे भाजप ला देशभरात सर्वाधिक 240 जागा जिंकता आल्या आहेत. देशभरात भाजप प्रणित एन डी ए ला स्पष्ट बहुमत मिळाले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे तिसरी टर्म सुरू करीत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ना. रामदास आठवले यांना शुभेछा दिल्या.

 

 

महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती चा महविजय करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष भाजप सोबत महायुती ला मजबूत साथ देईल असे आश्वासन ना. रामदास आठवलेंनी उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांना दिले.यावेळी सोबत रिपाइं चे युवक आघाडी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पप्पू कागदे आणि ना.रामदास आठवले यांचे सुपुत्र कुमार जित आठवले उपस्थित होते.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed