दिल्ली । झुंजार न्यूज
टीडीपीने आपल्या कोट्यातील मंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. TDP नेते जयदेव गल्ला यांनी X वर पोस्ट केले की, त्यांच्या पक्षाला मोदी 3.0 मंत्रिमंडळात कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळाले आहे. तीन वेळा खासदार असलेले राम मोहन नायडू हे टीडीपी कोट्यातून नव्याने स्थापन झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असतील.

नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास 40 जणांना मंत्री केले जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यासाठी आता पंतप्रधान कार्यालयातून मंत्र्यांना फोन केले जात आहे. मोदी 3.0 सरकारमध्ये टीडीपी आणि जेडीयूची महत्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळे एनडीएतील मंत्रीपद दिले जाणाऱ्या सर्वच नेत्यांना फोन केले जात आहे. नितिन गडकरी, राजनाथ सिंह, जीतन राम मांझी, जयंत चौधरी, चिराग पासवान, जेडीयू नेता रामनाथ ठाकूर आणि अनुप्रिया पटेल यांना फोन आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सध्या तरी महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल, रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांना फोन आला आहे. रामदास आठवले यांनाही फोन आला आहे. दरम्यान, खासदार प्रतापराव जाधव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. त्यांना मंत्रीपद मिळणार असल्याचे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. त्यांनाही पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आहे.

नागपुरातून निवडणूक जिंकून नितीन गडकरी पुन्हा एकदा संसदेत पोहोचले आहेत. गडकरी हे मोदी सरकारमध्ये सलग दोन वेळा मंत्री राहिले आहेत. जेडीयूचे खासदार रामनाथ ठाकूर हे राज्यसभेचे सदस्य आहेत.चिराग पासवान यांच्या पक्ष एलजेपीआरने बिहारमधील पाच जागांवर निवडणूक लढवली होती आणि पाचही जागा जिंकल्या होत्या. चिराग स्वतः हाजीपूरमधून निवडणूक जिंकली आहे

रामदास आठवले म्हणाले की , गेल्या १० – १२ वर्षापासून आम्ही भाजपाशी प्रामाणिकपणे आहोत रिपब्लिकन पक्ष हा तळागाळापर्यंत पोहचला असून झालेल्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी प्रामाणिक व जोमाने काम केले असल्यानेचं मला नूतन मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे कार्यकर्ते सुध्दा उत्साही असून मा नरेंद्र मोदी हे बुलंद नेतृत्व असून त्यांच्या नेतृत्वाखाली देशाचा , समाज्याचा विकास हा प्रखरतेने होत राहिल त्यांनी मला पुन्हा काम करण्याची संधी दिली त्यांचे मनापासून धन्यवाद !
