आश्वी | झुंजार न्यूज

राज्‍याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या वाढदिवसा निमित्‍त आज राज्‍य भरातून अनेक हितचिंतकांनी त्‍यांना शुभेच्‍छा दिल्‍या. यामध्‍ये प्रामुख्‍याने जेष्‍ठ समाजसेवक पद्मविभूषण आण्‍णासाहेब हजारे, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्‍यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍यासह प्रशासनातील प्रमुख आधिकारी आणि जिल्‍ह्यातून आलेल्‍या महायुतीच्‍या कार्यकर्त्‍यांनी सदिच्‍छा देण्‍यासाठी मोठी गर्दी झाली होती.
{“remix_data”:[],”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:false,”containsFTESticker”:false}
विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्‍याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले होते. त्‍याला प्रतिसाद देत शिर्डी विधानसभा मतदार संघांसह जिल्‍ह्यातील सर्वच तालुक्‍यांमध्‍ये रक्‍तदान शिबीर, वृक्षारोपन तसेच गरजू विद्यार्थ्‍यांना शालेय साहित्‍याचे वाटप करण्याचे उपक्रम संपन्‍न झाले.
मंत्री विखे पाटील यांनी लोणी बुद्रूकचे ग्रामदैवत म्‍हसोबा महाराज यांचे दर्शन घेतले. लोणी ग्रामस्‍थांच्‍या वतीने त्‍यांचे अभिष्‍टचिंतन करण्‍यात आले. प्रवरानगर येथे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या स्मृतीस्‍थळांचे त्‍यांनी दर्शन घेतले. लोणी येथील जनसंपर्क कार्यालयात राज्‍यासह जिल्‍ह्यातून , आश्वीतून शिबलापूर उपसंरपच दिलीप मुन्तोडे , भारत गीते , पोपट वाणी , अशोक तळेकर , भाऊसाहेब चव्हाण , दाढ संरपच सतिष जोशी , विठ्ठल लावरे , निलेश दातीर , पाथरे संरपच घोलप , अशोकराव जऱ्हाड आलेल्‍या हितचिंतकांनी मंत्री विखे पाटील यांना शुभेच्‍छा देण्‍यासाठी गर्दी केली होती.
oplus_2
सर्वांशीच संवाद साधत मंत्री विखे पाटील यांनी शुभेंच्‍छांचा स्विकार केला. समाज माध्‍यमांवरुनही विखे पाटील यांना अनेक मान्‍यवरांनी शुभेच्‍छा दिल्‍या आहेत. जेष्‍ठ समाज सेवक पद्मविभूषण आण्‍णासाहेब हजारे यांचाही आज वाढदिवस असल्‍याने मंत्री विखे पाटील यांनी त्‍यांनाही वाढदिवसाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्‍यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री दादा भूसे, मंत्री शंभूराजे देसाई कृषी मंत्री माजी मुख्‍यमंत्री   खा. अशोक चव्‍हाण,  विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ  माजी मंत्री मधुकरराव पिचड, एकनाथ खडसे, राष्‍ट्रीय साखर संघाचे अध्‍यक्ष हर्षवर्धन पाटील, जिल्‍हा सहकारी बॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले प्रवरा अभिमत विद्यापीठाचे डाॅ राजेंद्र विखे पाटील माजी खासदार सदाशिव लोखंडे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते  भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग शहराचे अध्यक्ष अभय आगरकर मराठा मोर्चाचे रमेश केरे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार सुजित झावरे  यांच्‍यासह महायुती मधील जिल्‍ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांनी मंत्री विखे पाटील यांना शुभेच्‍छा दिल्‍या  आहेत.
मतदार संघातील युवक कार्यकर्त्यांनी वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित केले होते. रक्तदान शिबीर शालेय विद्यार्थ्याना साहीत्याचे वाटप करण्यात आले.
राहता येथेही गणेश परीसरातील कार्यकर्त्यानी मंत्री विखे पाटील यांच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.गणेश कार्खान्याचे माजी नगराध्यक्ष कैलास कोते अभय शेळके मुकूंदराव सदाफळ रघूनाथ बोठे प्रकाश चिते कैलास सदाफळ यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.राहाता बार असोसिएशनच्या वतीने मंत्री विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला सर्व सदस्य उपस्थित होते.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *