आश्वी । झुंजार न्यूज

 

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री मा ना राधाकृष्ण विखे पाटील हे महाराष्ट्र राज्यातील मंत्रिमंडळातील एक जबाबदार व अस्टपैलू लोकप्रतिनिधी व्यक्तिमत्व असून त्यांचा आजचा अभिष्टचिंतन (वाढदिवस) सोहळा म्हणजे त्यांचा गुणगौरव सोहळा देखील म्हणावा लागेल.

 

आजपर्यंतच्या ना विखे पाटील साहेबांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीस बघितले तर साहेबांनी त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.एक महत्वाचा मुद्दा असा आहे की ना विखे पाटील यांनी महसूलमंत्री म्हणून ज्या दिवशी सूत्रे हातात घेतली त्यानंतर गेली पन्नास वर्षेपासून खंडकरी शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनी शासनाने वर्ग -2 म्हणून नवीन शर्तीने दिल्या हा खंडकरी शेतकऱ्यांवर अन्याय होता हे महसूलमंत्री ना विखे पाटील यांनी खंडकरी शेतकऱ्यांवर अन्याय असल्याचे मंत्रीमंडळाच्या बैठकीत सतत मांडून शासनाच्या निदर्शनास आणून दिले.सदरच्या जमिनीचा वर्ग -1 चा मार्ग मोकळा करून हा प्रस्ताव अधिवेशनमध्ये मंजूर करून खंडकरी शेतकऱ्यांचा अनेक वर्षेपासूनचा प्रश्न ना विखे पाटील यांनी सोडविल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांच्या वतीने साहेबांचे मनपूर्वक आभार.

 

ना विखे पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत असे अनेक प्रश्न मार्गी लावत क्रांतिकारी निर्णय घेत, त्यामध्ये बेरोजगारी, वीज, रस्ते,आरोग्य, दिव्यांगाणा आधार, आरोग्य शिबीर, शासन आपल्या दारीं या योजनेतून प्रलंबीत महसूल कामे, शेतीच्या योजना असे अनेक प्रश्न साहेबांनी आपल्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये सोडविले आहे.राज्य शासनाच्या अधीपत्याखाली असलेल्या शेती महामंडळ मधील जमीन राज्यातील गरजेच्या ठिकाणी गावठाण साठी, घरकुल, पाणी योजना, दवाखाना इत्यादी साठी ना विखे पाटील यांनी मंत्रिमंडळला शिफारस करून मिळवून दिल्या त्यामुळे राज्यातील बहुतेक गावात विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र असलेल्या साईबाबाच्या शिर्डी येथे औदयोगिक क्षेत्रासाठी देखील पाचशे एकर जमीन उपलब्ध करून दिल्याने भविष्यात येथे उदयोग व्यवसाय व रोजगार मोठया प्रमाणात उपलब्ध होईल.

 

आज ना विखे पाटील साहेबांचा वाढदिवस या निमित्ताने मी व माझ्या कुटुंबाच्या वतीने राहाता तालुक्यातील खंडोबा देवाच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो की साहेबांना उत्तम व निरोगी आयुष्य लाभो व पुढील राजकीय सामाजिक वाटचालीत साहेबांच्या हातून अशीच गोरगरीब जनतेची सेवा घडत राहो ही खंडोबा व साई चरणीचरणी प्रार्थना….

 

शब्दांकन : अशोकराव पाटील जऱ्हाड

आश्वी बुद्रुक तालुका संगमनेर अहिल्यादेवी होळकर प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य मुंबई

जिल्हाध्यक्ष भाजपा उत्तर नगर जिल्हा सरचिटणीस व पदवीधर मतदार संघ संपूर्ण प्रमुख

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *