आश्वी । झुंजार न्यूज

उन्हाळी सुट्टीनंतर पंधरा जून रोजी सर्वच शाळांमध्ये घंटा वाजला. पहिल्याच दिवशी शिक्षकांनी नवागतांचे स्वागत करत विदयार्थ्याना उत्साहात आणले. तर संगमनेर पचायत समिती माजी सदस्य यांच्याकडून चिमुकल्यांना गोड भोजन व चिमुकल्यांच्या हाती पाठ्यपुस्तके पडल्याने शिबलापूर प्राथमिक शाळेतील चिमुकल्याच्या चेहऱ्यावर द्विगुणी आनंद खुलल्याचे दिसून आले .
शासनाकडून थेट शाळास्तरावर पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येते. या वर्षी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, गणवेश मिळाले नसले तरी पाठ्यपुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत होते.
शिबलापूर येथील उपसंरपच दिलीप तबाजी मुन्तोडे यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले . यावेळी मुन्तोडे यांच्याकडून चिमुकल्यांना पहिल्या दिवशीचं गोड भोजन देण्यात आले . यावेळी पत्रकार राजेश गायकवाड , मुख्यध्यापिका श्रीमती सविता भूसाळ , वाकचौरे , पिचड , मुठे आदीसह पालक विदयार्थी उपस्थित होते .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *