{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

कोपरगांव । झुंजार न्यूज

सध्या खरीप हंगाम सुरू झाला आहे,  पावसाने ओढ दिली आहे, शेती पीक उत्पादनासाठी खते हा महत्त्वाचा घटक आहे,  “जय किसान ” पारादीप फॉस्फेट्स कंपनीचे  ” जय किसान भारत ट्रिपल सुपर फॉस्फेट 46% स्फुरद खते रेल्वेने कोपरगाव येथे दाखल झाली आहेत नगर व नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा बाराशे टन खतांचा रॅक वितरित केला जाणार आहे अशी माहिती  महाव्यवस्थापक अनिल चिंचोलकर यांनी दिली. या खत गोण्यांची उपस्थितांच्या हस्ते विधिपथ पूजा करण्यात आली.
             
ते पुढे म्हणाले की,  या खतात 46% स्फुरद असून मका, सोयाबीन, कांदा, द्राक्ष,भाजीपाला व सर्व पिकांना उपयुक्त असून डीएपी खताला पर्यायी खत म्हणून उपयोग करता येतो., तेव्हा शेतकऱ्यांनी या खताचा नियमित वापर करावा असे आवाहन केले.  याप्रसंगी विपणन व्यवस्थापक  ज्ञानेश्वर ठाकरे, राजेंद्र रुपनर,  यांचेसह विविध खत विक्रेते उपस्थित होते. 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed