आश्वी । झुंजार न्यूज
बेडूक विवाह, ज्याला आसामीमध्ये भेकुली बिया म्हणतात, ही आसाममध्ये खोलवर रुजलेली एक पारंपारिक प्रथा आहे. आसामी परंपरेनुसार, बेडूक आणि पाऊस यांच्यातील संबंध स्पष्ट करणारी एक कविता पूर्वजांकडून उत्तीर्ण झाली आहे. शेतकरी ढगांना पाऊस का पडत नाही हे विचारतात आणि ढग उत्तर देतात की बेडूकांच्या आरडा ओरडा शिवाय पाऊस पडणार नाही. याचे कारण म्हणजे पावसाळा हा बेडकांच्या मिलन कालावधीशी जुळतो आणि म्हणूनच, त्यांच्या क्रोकिंगमुळे पाऊस येतो असे मानले जाते

आश्वी बु ता संगमनेर येथील श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र येथे ग्राम आभियाना अंतर्गत सुनिल ताजणे यांच्या वस्तीवर शास्त्रानुसार परीसरात पाऊस पडावा यासाठी बेडकांचे लग्न लावण्यात आले.सुरवातीला शुभम ताजणे व स्वाती ताजणे यांच्या हास्ते श्री स्वामी समर्थ यांची आरती संपन्न झाली. तसेच भगवान इंद्र यांना प्रसन्न करण्यासाठी पर्जन्य य़ज्ञ व श्री स्वामी समर्थ महाराज यांना ही पाऊस पडण्यासाठी सकडे घालण्यात आले. यावेळी प्राध्यपक आप्पासाहेब शेळके यांचे वास्तुशास्त्रा विषयक मार्गदर्शन झाले तर आध्यात्माकडे काडे तरून पिढीने का वळावे या विषयी ज्येष्ठ सेवेकरी दत्तात्रय पवार यांनी मार्गदर्शन केले यावेळी सोसायटी सदस्य मंच्छीद्र ताजणे,ग्रां.प.सदस्य बबवराव शिंदे, एकनाथ ताजणे, नामदेव ताजणे, तसेच याविवाह प्रसंगी वऱ्हाड मंडळी किरण गायकवाड,नितीन ताजणे,ऋत्वीक वाडेकर,तुषार ताजणे,अभिषेक ताजणे आदी सेवेकरी, शेतकरी उपस्थित होते.

वैदिक शास्त्रानुसार ग्रहांचे नक्षत्र परिवर्तनसुद्धा एका ठराविक काळात होत असते. त्यानुसार सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाचा कालावधी सुद्धा निश्चित आहे. सूर्य १५ दिवसांनी एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश करत असतो. पंधरा दिवसांपूर्वी सूर्या मृगशिरा नक्षत्र प्रवेश केला होता. आता १५ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सूर्य मृगशिरा नक्षत्रातून निघून आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करत आहे. पावसाच्या नक्षत्रांपैकी एक आर्द्रा नक्षत्र होय. २२ जून २०२४ रोजी सूर्य आर्द्रा नक्षत्रात विराजमान झाले असुन येत्या ६ जुलैपर्यंत सूर्य आर्द्रा नक्षत्रातच राहील. या १५ दिवसांत मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे असल्याचे माहिती प्राध्यपक आप्पासाहेब शेळके यांनी दिली .

चौकट
मानवी विवाह प्रमाणे बेडकांचा विवाह संपन्न झाला. वरपक्षाकडुन मामाचे कार्य देशमुख महाराज तर बहिण सानिया पवार ने खांद्यावर अक्षदा पकडल्या तर वधु पक्षाकडुन मामा म्हणून रामनाथ जऱ्हाड तर बहिण म्हणुन प्रतिक्षा गायकवाड हीने खांद्यावर अक्षदा पकडल्या तर कान पिळ्याचा मान वधुचा भाऊ मंगेश निघुते यांना मिळाला.
