संगमनेर । झुंजार न्यूज
नुकत्याचं झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला असून संपूर्ण मतदार संघातून निवडणुकीच्या कालावधीत कार्यकर्त्यासह मतदारांनी दाखविलेल्या प्रेम व केलेल्या सहकार्याबद्दल वंचित बहुजन उमेदवार तथा राज्य प्रवक्त्या उत्कर्षाताई रुपवते यांनी गावो – गावी , वाड्या – वस्त्या जावून मतदारांच्या गाठी भेटी घेत त्यांच्याशी संवाद साधत एक आपुलकीचा सहवासातून धन्यता मानत ऋणूबंध जपल्याचे चित्र दिसत आहे .

लोकसभा निवडणुका होवून दीड महिना झाला . शिर्डी लोकसभा निवडणुकीतून एक नाविन्य पूर्ण चित्र दिसून आले . राज्याच्या नव्हे तर देशातचं मोठया प्रमाणात राजकिय उलथ्या पालथ्या झाल्या एका पक्षाचे दोन पक्ष झाल्याचे दिसून आल्याने राज्यात राजकिय मिसळ तयार झाली . शिर्डी लोकसभेच्या निवडणुकीतून दोन शिवसेनेच्याचं संघर्ष दिसला . त्यात कमी कालावधीत वंचित पक्षाच्या रुपाने उत्कर्षा रुपवते यांची एंन्ट्री झाली . राजकिय इतिहासात पहिल्यांदाचं लोकसभेकरिता महिलाला अवतरल्याने संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष्य लागले . कमी कालावधी असताना सुध्दा उत्कर्षा रुपवते यांनी गावो – गावी पिंजून काढल्याने शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना घाम फोडला . ” आता परिवर्तन होवून महिलाचं बाजी मारणार असे चित्र दिसले मात्र शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारामागे आजी – माजी महसूल मंत्री तथा सहकार सम्राट तसेचं तीन – तीन पक्षाचे कार्यकर्ते व बांधिल मतामुळे रुपवते यांनी एकाकी खिंड लढविली . रुपवते यांना मिळालेली मते ही भविष्याच्या दृष्टीने कलाटणी देणारी मते असणार हे निश्चित झाल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत यांचा नक्कीचं परिणाम दिसणार आहे .
निवडणुकीच्या रणधुमाळीत उत्कर्षाताई रुपवते यांनी परिवर्तनाकरिता मतदारापर्यंत पोहचल्या मात्र दोन बलाढय शक्ती पुढे तिसरा पर्याय म्हणून लढल्या मतांनी हरल्या मात्र आपुलकीने व प्रेमाने व अनुभवाने त्या जिकल्या त्याचं अनुषगांने निवडणुका झाल्यानंतर प्रत्येकांच्या दारो दारी पोहचून लोकांशी संवाद साधून आपुलकीने आभार मानताना रुपवते संध्य दिसत आहे .
अकोले , संगमनेर , राहाता , कोपरगांव , श्रीरामपूर , नेवासा या विधानसभा मतदारसंघातील विविध गावांत जावून कार्यकर्त्यांची आणि ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांचे आभार मानत आहे तर त्यांच्यासोबत गावांतील विविध विषयांवर चर्चा करुन समस्या सोडविण्याकरिता पुढे सरसावत आहे .



