आश्वी l झुंजार न्यूज

 

समाज्याकरिता , लोकाकरिता सातत्याने विकासात्मक राजकारण केले यातून कधी कोणाची – कोणासाठी ही जिरवा – जिरवीचे काम केली नाही प्रेमाने व साकारात्मक विचार केला संध्या मात्र विरोधकांकडून  दडशाही , हुकुमशाही पध्दतीचे राजकारण होत असून त्यात ज्या गावामध्ये आपली सत्ता आहे अशा गावांमधील होत असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे कामचं थांबवून पाण्यावरून सुध्दा राजकारण करण्याचे विषारी काम करत असल्याची दुर्दवी बाब असल्याचे विखेचे नाव न घेता अशी टिका  माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी केली 

संगमनेर तालुक्यातील आश्वी बु॥ येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बॅकेच्या नूतन शाखेचे उट्रघाटन माजी मंत्री आ बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले याप्रसंगी थोरात हे बोलत होते . 

 

यावेळी माजी आमदार डॉ सुधीर तांबे , जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे ,  सौ दुर्गाताई तांबे , प्रभावतीताई घोगरे , एकनाथ गोंदकर , डॉ जयश्रीताई थोरात , बाळासाहेब गायकवाड , रोहित वाकचौरे , डॉ राजेंद्र पिपाडा , बाबा ओहोळ , गणपत सांगळे , नारायण कार्ले , सुधीर लहारे , विजय दडवंते , डोंगरे , पंकज लोढे , नवनाथ आंधळे , गीताराम गायकवाड , ॲड रामदास शेजूळ , सचिन चौगुले, राजेंद्र चकोर , विक्रम थोरात , गणपत हजारे , आश्वी संरपच नामदेव शिंदे , उपसंरपच सौ अरुणा हिंगे , सुमतीलाल गांधी , संजय थोरात , ललिता दिघे , शितल लहारे  , नाना शेळके , अविनाश सोनवणे , शांताराम फड , राजेंद्र काजळे , ब्रिज मोहन जऱ्हाड , नानासाहेब शिंदे बँक मॅनजर अंबादास वाणी आदी पदाधिकाऱ्यासह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने होते .

 

यावेळी आ. बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की , आपला राजकिय दृष्टीकोन हा सातत्याने सकारात्मक राहिला आहे . सामान्य जनता , शेतकरी , कष्टकरी यांच्या विविध समाज्यातील लोकांच्या हिताकरिता राजकारण केले . गणेश कारखाना व परिसरातील लोकाच्या हिताकरिता आपण तेथे गेलो लोकांच दुःख जाणून घेतल्यानेचं आपली सहकार्याची भूमिका राहिली राजकारणात अहंकार जास्त काळ टिकत नाही . तेव्हा लोकांशी जीवाशी खेळणे चांगले नाही लोक आता जागृत झाले आहे तेव्हा आता शहाणे व्हा ! आश्वी व परिसराशी गेल्या ४० वर्षाचे ऋणुबंध आहे हा परिसर आमदारकीशी नसला तरी संगमनेर मधील सहकारी संस्थेशी नक्की जोडलेला आहे आता संगमनेर प्रमाणेचं राहाता तालुक्याला सुध्दा सहकाराच्या माध्यमातून जोडायचे असल्याचे थोरातांनी शेवटी सांगितले 

यावेळी माजी आमदार डॉ सुधीर तांबे , बाळासाहेब गायकवाड , डॉ जयाताई थोरात , डॉ राजेंद्र पिपाडा आदीचे भाषणे झाली .

 

 

 

प्रास्ताविक बँक चेअरमन सुधाकर जोशी , स्वागत विजय हिंगे यांनी केले तर सुत्रसंचालन नामदेव कहाडंळ यांनी केले .

 

चौकट

प्रभावती घोगरे यांनी आपल्या भाषणातून अनेक षटकार ठोकत संध्याचे राजकारण हे संभ्रम निर्माण करणारे असून राजकारणाच्या शर्यतीत उतरताना अहंकार नसावा नाही जनता म्हणते चले जावो ! समाज्याच्या हिताकरिता राजकारण करा स्वार्थी भूमिका ठेवू नका काळ बदलत चालला आहे . ” एक शर्यत हरल्यास दुसऱ्या शर्यतीचा शांत पध्दतीने विचार करा .

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *