संगमनेर l झुंजार न्यूज
सामाजिक कार्यकर्ते प्रवीण अरुण कानवडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संगमनेर शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रवीण कानवडे यांना नियुक्ती पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते देण्यात आले.

संगमनेर येथील प्रवीण कानवडे यांनी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अनेक गोर गरीबांच्या समस्या सोडवल्या आहेत. त्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अनेक आंदोलने व उपोषणे केली आहेत. जनमाणसांमध्ये ते परिचित असून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न लवकरात लवकर कसे सुटतील यासाठी ते सदैव प्रयत्न करत असतात. गेल्या २० वर्षा पासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असल्याने त्यांच्या कामाची तत्परता पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) त्यांच्या कामाची दखल घेत श्री. कानवडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस संगमनेर शहराध्यक्ष पदावर नियुक्ती केली. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या व राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या ध्येय धोरणानुसार ८०% समाजकारण व २०% राजकारण करून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष संगमनेर शहरातील समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पक्षाचे ध्येय धोरणे पोहचवाल असा विश्वास श्री. कानवडे यांच्यावर पक्षाने टाकला आहे.

यावेळी नवनियुक्त शहराध्यक्ष प्रवीण कानवडे म्हणाले की, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या व राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला याला मी कधीही तडा जावू देणार नाही. पक्षाच्या ध्येय धोरणानुसार ८०% समाजकारण व २०% राजकारण करणार असून ही निवड मी सार्थ ठरवून दाखवेन. तसेच पक्ष वाढीसाठी जे काही प्रयत्न करता येतील ते करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष कपिल पवार, संगमनेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, मार्गदर्शक दिलीप अण्णा शिंदे,जिल्हा उपाध्यक्ष मनीष माळवे, राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष अक्षय भालेराव, महिला आघाडी तालुका अध्यक्ष वैशालीताई राऊत, अशोक काळे, राहुल राऊत, भाऊ मस्के , अमोल राऊत, सुनील बोराडे आदी सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रवीण कानवडे यांच्या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

