संगमनेर l झुंजार न्यूज

नाशिक विभाग कार्यक्षेत्र असणारी व संगमनेर तालुक्यात अग्रगण्य असणाऱ्या संग्राम पतसंस्था व जयहिंद लोकचळवळ, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर मार्गदर्शन मेळावा व गुणवंत गौरव सोहळा शनिवार, दिनांक १०/०८/२०२४ रोजी सकाळी ८.३० वा. मालपाणी लॉन्स, शेतकी संघ पेट्रोल पंपासमोर, नाशिक- पुणे रोड, संगमनेर येथे आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन  राणीप्रसाद मुंदडा यांनी दिली आहे.
       
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थांचा व विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते होत आहे. सदर कार्यक्रम मा. आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. तसेच सदर कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त सनदी अधिकारी मान. डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण (Ex.IRS), माजी उपसंचालक, ‘ईडी’, यांना निमंत्रित करण्यात आले आहे.   या कार्यक्रमास आमदार सत्यजीत दादा तांबे, सौ. दुर्गाताई तांबे व डॉ. जयश्रीताई थोरात यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

           
तरी सदर कार्यक्रमासाठी संगमनेर शहर व परिसरातील प्रमुख मान्यवरांना निमंत्रिण देण्यात आले आहे. या व्याख्यानाचा लाभ विद्यार्थ्यांनी व पालकांनी घ्यावा असे आवाहन चेअरमन  राणीप्रसाद मुंदडा व व्हा. चेअरमन इंजि. विजय गिरी यांनी केले आहे.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed