कोपरगाव l झुंजार न्यूज

राज्यसह देश विदेशातअनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व त्र्यंबकेश्वर मंदिराच्या धर्तीवर बांधण्यात आलेल्या कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव  येथील रेणुका देवी  मंदिरात वैजापूर तालुक्यातील लाख खंडाळा येथील रहिवासी भाजप जिल्हा उपाध्यक्ष मोहनराव आहेर (ह. मु संभाजीनगर ) यांनी काचेचे मोठे विद्युत झुंबर दान दिल्याने उक्कडगाव रेणुका देवी मंदिराचे शोभा खुलून दिसत आहे. 
           
मंदिराचे ट्रस्ट अध्यक्ष अशोक शिंदे, विश्वस्त निवृत्ती शिंदे, लुखा शिंदे, सोपान शिंदे, बाळासाहेब शिंदे, लक्ष्मण शिंदे व ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत करून देवस्थानच्यावतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
           
याप्रसंगी मोहनराव आहेर, आकाश आहेर, अमोल ठाकूर  बाबासाहेब जाधव, शरद मोरे, करण जेजुरकर, भाऊराव गोराणे, परेश चांगले, सुमित जाधव यांनी देवी मातेची पाद्यपूजा व आरती केली.       
                 
संभाजीनगर येथील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोहनराव शेलार यांनी या अगोदर देवगड दत्त संस्थानला झुंबर, स्कार्पिओ चार चाकी वाहन व २७  किलो चांदी अर्पण केली होती., तसेच शिवूर येथील संत बहिणाबाई संस्थांन ला बोलोरो चार चाकी वाहन भेट दिलेले आहे, शैक्षणिक धार्मिक कार्यासाठी ते नेहमी अग्रेसर असतात. 
               
सध्या उक्कडगाव तालुका कोपरगाव येथील येथील रेणुका माता  देवीचे  श्रद्धास्थान असलेल्या श्री जगदंबा मातेचे मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे, भाविकांनी विटा, वाळू, सिमेंट, स्टील, रंग, पेवर ब्लॉक, व रोख स्वरूपात आर्थिक दान देण्याचे आवाहन मंदिर ट्रस्ट अध्यक्ष अशोक शिंदे व व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे. नंदू शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed