श्रीरामपूर । झुंजार न्यूज

 

अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी श्रीरामपूर जिल्हा करावा तसेच जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय सिविल हॉस्पिटल सब जेल साठी जागा आरक्षित करा मागणीसाठी शुक्रवार दि. ९ ऑगस्ट क्रांती दिनी दुपारी १२ वाजता स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली जेल भरो आंदोलन करण्यात आले गांधी पुतळ्या येथे सर्वपक्षीय नेते जमून श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे या घोषणाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला तसेच श्रीरामपूर शहर पोलीसानी आंदोलन करताना अटक करून सुटका करण्यात आली

 

 

त्यावेळी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना मागण्याचे निवेदन देण्यात त्यावेळी सुभाष त्रिभुवन म्हणाले पुढील पंचवार्षिक निवडणुकीत श्रीरामपूर आमदारकीचे आरक्षण उठवून ते आरक्षण राहत्याला जाणार आहे कारण राहत्याला मागासवर्गीय समाजाची लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना हक्काचा मतदारसंघ राहणार नाही म्हणून त्यांनी श्रीरामपूर जिल्हा करून त्यांच्यासाठी श्रीरामपूर मतदारसंघ सोईचा हक्काचा होईल त्यांना श्रीरामपूरची जनता प्रचंड बहुमताने विजय करतील तसेच शिर्डी लोकसभा मतदार संघातील खासदार देखील त्यांच्याच घरातला होईल असे ते म्हणाले कार्याध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की श्रीरामपूरमध्ये सर्व सुख सोयी असताना सरकारी कार्यालयासाठी सरकारी जागा भरपूर असताना बहुसंख्य लोकांची मागणी आहे

 

 

श्रीरामपूर जिल्हा करावा सरकारने याची गंभीर दखल घेऊन श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन हाती घ्यावे लागेल सचिव सोनवणे म्हणाले की भौगोलिक दृष्टिकोनातून श्रीरामपूरच जिल्हा होण्यास योग्य आहे सहकारी अहवाल देखील श्रीराम प्रचार बाजूने गेलेला आहे म्हणून सरकारने श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा करून टाका

 

 

अशोक कानडे म्हणाले की श्रीरामपूर जिल्हा करावा अनेक वर्षापासून मागणी आहे परंतु राजकीय बोटशेपी धोरणामुळे त्याच्यात अडथळा निर्माण होत आहे जर समजा श्रीरामपूर जिल्हा झाला तर मोठे उद्योगधंदे येऊन श्रीरामपूरला मोठा निधी उपलब्ध होऊन सर्वसामान्यांचा जनतेचा रोजी रोटीचा प्रश्न सुटेल

 

 

शिवसेनेचे संजय छलारे म्हणाले की श्रीरामपूर शहरांमधील नेत्यांनी श्रीरामपूरकराच्या जीवावरती राजकारण केले पदे उपभोगले त्यांनी श्रीरामपूर जिल्ह्याच्या आंदोलनामध्ये सक्रिय भाग घेताना दिसत नाही ही शोकांतिका आहे

 

 

मर्चंट असोसिएशन अध्यक्ष सुनील गुप्ता म्हणाले की श्रीरामपूर जिल्ह्यासाठी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीने जे जे आंदोलन हाती घेतील त्यांच्या आंदोलनाला आमचा कायम पाठिंबा राहील

 

 

संघटक अशोक उपाध्ये म्हणाले की आपण सगळ्यांनी दहा-पंधरा गाड्याचे शिष्टमंडळ घेऊन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन दिली पाहिजे

 

 

त्यावेळी लहुजी सेनेचे बाळासाहेब बागुल हनीफ पठाण गौतम उपाध्ये डॉ. संजय नवथर पुरुषोत्तम झवर बाळासाहेब खावीया संजय कासलीवाल मुन्ना पठाण रजाक पठाण संजय साळवे दीपक कदम अमोल कुमार मिसाळ बाळासाहेब चांडोळे मच्छिंद्र साळुंखे संघराज त्रिभुवन शुभम लोळगे अशोक अभंग दीपक माखिजा संजय बाव्हाळ आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed