{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

 

यशोधन कार्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा

 

संगमनेर l झुंजार न्यूज

 

 

आदिवासी हे या भूमीचे मूळ मालक असून अत्यंत कष्टाळू आणि भोळे भाबडे आहेत. त्यांच्या हक्कांसाठी आपण सर्वांनी एकत्रित त्यांच्या सोबत लढा देणे गरजेचे असून शिक्षणातून या सर्वांच्या प्रगती करता आपण सर्वांनी काम करूया असे आवाहन युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ जयश्रीताई थोरात यांनी केले असून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी बांधवांचे मोठे योगदान असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले आहे.

 

काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी समवेत आदिवासी सेवक प्रा बाबा खरात, श्रीराम कुऱ्हे, बाळकृष्ण गांडाळ, अशोक हजारे, डॉ.नामदेव गुंजाळ, रूपाली वरपे, नवनाथ महाराज आंधळे, युवक काँग्रेसचे हर्षल राहणे, रमेश गफले, वैष्णव मुर्तडक, विशाल ढोले, अतुल लहामगे ,सदानंद गाडेकर ,अलोक बर्डे, आदित्य बर्गे तौसीब मणियार, अमित गुंजाळ, आदींसह युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा एक परिवार आहे. समाजातील सर्व घटकांना विकासाची समान संधी असून एकत्रितपणामुळे संगमनेर तालुका हा विकासातून राज्यात अग्रगण्य आहे. आदिवासी बांधव हे या भूमीचे मूळ मालक असून त्यांच्या समाजात शिक्षणातून मोठी प्रगती होऊ शकते म्हणून आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासींच्या विकासासाठी संगमनेर तालुक्यात विशेष काम केले जात असल्याचेही ते म्हणाले

 

तर प्रा.बाबा खरात म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी गोरगरीब सर्वसामान्य व आदिवासींच्या विकासासाठी यशोधनच्या माध्यमातून सातत्याने चांगले काम केले असून शासनाच्या विविध योजना वाडी वस्तीवर पोहोचवण्यासाठी जनसेवकांच्या मदतीने काम केले जात आहे आदिवासी विद्यार्थ्यांना होस्टेल सह शिक्षणात सातत्याने मदत करण्यासाठी यशोधन कार्यालय कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले

 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीराम कु-हे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. आभार बाळकृष्ण गांडाळ यांनी म्हणले

 

 

चौकट


डॉ.जयश्रीताई थोरात यांनी धरला आदिवासी नृत्यावर ठेका

आदिवासी गौरव दिनानिमित्त अमृतवाहिनी मॉडेल स्कूल मध्ये असलेल्या आदिवासी विद्यार्थिनींनी पारंपारिक वेशात आदिवासी नृत्य सादर केले. यावेळी विद्यार्थिनीसह युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांनीही आदिवासी नृत्यावर ठेका धरला

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *