एकविराच्या शिवणक्लास मधून 60 महिलांना प्रशिक्षण पूर्ण

संगमनेर | झुंजार न्यूज 

 
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसच्या अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या एकविरा फाउंडेशन मुळे तालुक्यातील महिलांना उद्योजकतेसाठी बळ मिळाले असल्याचे प्रतिपादन ब्रह्मकुमारी केंद्राच्या भारती दिदी यांनी  केले आहे.

यशोधन कार्यालय येथे एकविरा फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी असलेल्या शिवणक्लासच्या पहिल्या बॅचचे प्रशिक्षण पूर्ण झाले यावेळी समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. जयश्रीताई थोरात होत्या. तर व्यासपीठावर ब्रह्मकुमारी पद्मा दीदी, ब्रह्मकुमारी योगिनी दीदी, प्रशिक्षक सौ.शिला करंजेकर सौ.सुजाता बोबडे आदी उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना ब्रह्मकुमारी भारती दीदी म्हणाल्या की, महिलांवर कुटुंबाची मोठी जबाबदारी असते. आणि ती जबाबदारी सर्व महिला अत्यंत सक्षमपणे पार पडतात त्यातून वेळ काढून स्वतःच्या कुटुंबाला मदत करावी यासाठी एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून शिवण क्लासचे प्रशिक्षण घेत आहेत या महिलांना उभारी देण्यासाठी डॉ जयश्रीताई थोरात यांनी घेतलेला पुढाकार हा अत्यंत कौतुकास्पद आहे.

महिलांच्या आरोग्याबरोबर महिलांचे सबलीकरण व आर्थिक सक्षमीकरण याकरता एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून काम होत असून सर्व महिलांनी आनंदी कुटुंब कसे राहील याकरता ध्यानधारणा करावी असे आवाहनही त्यांनी केले.

तर डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, महिला आनंदी तर कुटुंब आनंदी. म्हणून महिलांच्या आरोग्याबरोबरच त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सातत्याने एकविराच्या वतीने  उपक्रम राबवले जात आहेत. काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी मोठे काम होत असल्याचेही त्या म्हणाल्या

तर यावेळी ब्रह्मकुमारी पद्मा दीदी व ब्रह्मकुमारी योगिनी दीदी यांनीही उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले

प्रशिक्षण घेतलेल्या विविध महिलांनी यावेळी आपली मनोगत व्यक्त केली याप्रसंगी एकविराच्या सर्व महिला भगिनी उपस्थित होत्या


चौकट

 60 महिलांना मोफत प्रशिक्षण

एकविराच्या वतीने 30 महिलांना बेसिक शिवण क्लास व 30 महिलांना ऍडव्हान्स शिवण क्लासचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्व महिलांना सर्टिफिकेट व सुयोग मशनरी च्या वतीने टेलरिंग किट भेट देण्यात आली.

 एकविराच्या या उपक्रमामुळे आम्हा सर्व महिलांना बेसिक व ॲडव्हान्स ट्रेनिंग मिळाले याचा फायदा आम्हाला नक्कीच भविष्यासाठी होणार असून महिनाभर अत्यंत हसत खेळत व आनंदाने आम्ही प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणामुळे आम्हाला सर्व नवीन महिला मैत्रिणी मिळाल्या असून हा एक परिवारात झाला आहे

सौ रुपाली सोनवणे
प्रशिक्षणार्थी
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed