संगमनेर l झुंजार न्यूज
देशभरात आझादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा लावत आनंदोत्सव साजरा होत असतानाचं याच आनंदोत्सवाचे औचित्य साधुन निळवंडे धरणावर तिरंगा विद्युत रोषणाई करण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रदिप हापसे यांनी दिली आहे .

याबाबत समजलेली विश्वसनीय माहिती अशी की जलसंपदा विभागाने निळवंडे धरणावर विद्युत रोषणाई करुन निळवंडे धरणाचे आकर्षण वाढविल्याचे दिसून येत असून पडत्या पाण्यावरून तिरंगा विदयुत रोषणाईने पर्यटक आकर्षक होतान दिसत आहे .

स्वातंत्र्याच्या दिनाचे औचित्य साधुन जलसंपदा विभागाने तिरंगा विद्युत रोषणाईने निळवंडयासह भंडारदरा धरणावर लखलखाट करुन सौंदर्यात भर घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. सुरुवातीला स्पीलवे ओहरप्लो गेटला तिरंगा विद्युत रोषणाई करण्यात आली असुन अंब्रेला फाँलला देखील तिरंगा विद्युत रोषणाई करण्यात येत आहे .

