{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

बालपणच्या १ लाख बियाच्या झाडेचे रोपन महाराष्ट्रभर देवराई करणार

पानोडी | झुंजार न्यूज 

मुलांच्या डोक्यात झाड लावायचे तसेच त्याच्या मनात ब्रीज लावण्याचे काम यापुढे समाजाने करणे आवश्यक आहे. वृक्ष आहे तर आपण आहोत.देवराई म्हणजे देवाच्या नावाखाली घातलेले जंगल , हजारो वर्षापासुन आयुर्वेदातील अनेक झाडे जिवंत होती. माणसाचे जंगल वाढले तस – तसे झाडाचे जंगल नष्ठ होत गेले. दिवसेन दिवस झाडे कमी होत आहे. सम विचारी लोंकांना बरोबर घेऊन त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची आवश्यकता आहे.तरच झाडे जगतील. जगाच्या पाठीवर अनेक भ्रष्ट लोके आहेत त्याच्या मागे जाण्या ऐवजी शालेय विदयार्थ्यांसह गावातील चांगल्या लोकांना बरोबर घेऊन चांगली देवराई तयार करण्याच आपला उद्देश असल्याचे सह्याद्री देवराईचे संस्थापक सिनेअभिनेते वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी झुंजार न्यूजशी बोलताना सांगितले.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[“local”],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“addons”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील बालपन स्कुल भेटीप्रसंगी ते बोलत होते. देवराईची महाराष्ट्रातील पहिली बिज बॅक ही पानोडीच्या बालपण या शाळेपासुन सुरूवात करत असल्याचे वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी सांगितले. तर बालपणच्या ७०० विद्यार्थीनी प्रत्येकी १०० बिया गोळा करायच्या व शिक्षकांनी विविध प्रकारच्या वेलीच्या बिया विद्यार्थांना गोळा करण्यास मदत करायंची बालपणच्या एक लाख बिया पासुन तयार झालेल्या विविध रोपाची पुढील वर्षी महाराष्ट्रभर सह्याद्री देवराई मार्फत वृक्षारोपण करण्यात येईल. चांगल्या लोकांबरोबर काम करण्याने चांगली उर्जा मिळते येथुन पुढे सह्याद्री देवराई व बालपण महाराष्ट्रभर झाडे लावण्याचे काम करणार असल्याचे अभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगितले.

यावेळी न्याय डेअरी चे युवा उद्योजक सागर गिते ,सह्याद्री देवराईचे खजिनदार सचिन चांदणे, संगित दिग्दर्शक शैलेंद्र निसर्गगंध, जयप्रकाश प्रधान,प्राचार्य सोनाली मुंढे,शिवाजी मुंढे, प्रा.सुचिता बालोटे,प्रा स्नेहा भंडीरी,प्रा पुजा जऱ्हाड, निलेश चोपडा , विनायकराव थोरात , बबनराव कराड ‘ डॉ शिवाजी फड , सुदाम सांगळे , अशोक गीते , पत्रकार राजेश गायकवाड , गोरक्षनाथ मुंढे , गणेश सांगळे आदिसह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी शिवाजी मुंढे यांनी प्रास्ताविक केले 

सुर्य उगवतो तेव्हा फक्त दिवस सुरू होतो पण झाडे उगवतात तेव्हा चांगले दिवस सुरू होतात.जसे झाड हमखास फळ देते त्यांच प्रमाणे झाडामुळे मोठ्या प्रमाणात आक्सिजन निर्मीती होत असते. जास्तीत जास्त झाडे शाळेतील मुलांनी लाववित तसेच त्यांना वर्षेभर पाणी देवून जगवली पाहिजेत.

सचिन चांदणे (खजिनदार,सह्याद्री देवराई )  

बालपन विदयार्थ्यांनी तयार केलेले गावरान बियाणांची माहिती घेते सयाजी शिंदे बालपनच्या विदयार्थ्यांबरोबर झाडे प्रेमी संगीतमय गाण्यावर ताल धरुन नाचले तर विदयार्थ्यांचे झाडावरील प्रेम व कलागुणांचे कौतुक करत एक खलनायकाच्या भुमिकेत पडदयावर दिसणारे व्यक्तीमत्व विदयार्थीं व लोकांच्या गराड्या एक अस्सल जीवनातील खरा अभिनेता लोकांना भावल्याचे दिसून आले .

छाया – राजेश गायकवाड , पानोडी )

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed