संगमनेर l झुंजार न्यूज
संगमनेर तालुका सहकारी दूध संघात 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येवून स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

यावेळी रणजितसिंह देशमुख म्हणाले की , आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र झाला आपल्या देशावर इग्रजांनी १५० वर्ष राज्य केले . इग्रजांच्या गुलामगिरीतून आपल्या महापुरुषांनी आपल्या राष्ट्राला मुक्त केले असून गेल्या ७७ वर्षच्या कालखंडात राज्यकर्त्यांनी आपल्या नवी दिशा दाखवून विकासात्मक दृष्टीच्या शिखरावर पोहचविले असून इग्रजांनी देश सोडताना म्हटले होते की , भारतीय लोक देश चालविता येणार नाही मात्र देशातील राज्यकर्त्यांच्या माध्यमातून देशांनी सर्व क्षेत्रात आघाडी घेतल्याचे सांगितले

यावेळी दूध संघाचे संचालक विष्णूपंत ढोले , संतोष मांडेकर , कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी , फायनान्स मॅनेजर शिंदे , सर्व विभागप्रमुख व अधिकारी व सर्व संघ सेवक उपस्थित होते .

