पानोडी l झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील जाधववस्तीवर गेल्या अनेक दिवसापासून धुमाकुल घालणारा दीड वर्षिय बिबट्या हा गुरुवारी रात्री ११ वाजल्याच्या सुमारास शिकारीच्या शोधात उभ्या असणाऱ्या मकाच्या पिकात शिरला अन् जेल बंद झाला .

आश्वी – साकूर रस्त्यावरील स्वामी समर्थ केंद्र व परिसरात गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याने धुमाकुळ घालून दहशत निर्माण केली होती . त्यामुळे जाधव वस्ती व परिसरातील मानवी जीवन अस्थव्यस्थ झाल्याने औचित जाधव , अमोल जाधव , पप्पू जाधव आदीसह युवकांनी पुढाकार घेत वनविभागांशी संपर्क करुन यापरिसरात पिंजरा लावण्याकरिता सातत्याने पाठपुरावा केल्याने वनाधिकारी , सुभाष सांगळे , सुहास उपासनी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक हरिचंद्र जोजर , वनकर्मचारी देवीदास चौधरी , संजय गागरे , पोपट गागरे , सुकदेव सूळ , नजीर शेख ‘ महेश वाडेकर यांनी पिंजरा लावला मात्र बिबट्या काही केल्याने पिंजऱ्याजवळ फिरकलाचं नाही . अखेर सहा दिवसाच्या प्रतिक्षेने गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास शिकारीच्या नादात दीड वर्षिय बिबट्या पिंजऱ्यात अडकला अन् परिसरातील लोकांनी सुटकेचा श्वास घेतला .

यावेळी संगमनेर दूध संघाचे संचालक विक्रम थोरात , आबासाहेब जाधव , संदिप थोरात आदीसह युवक व ग्रामस्थांनी सहकार्य केले .

Post Views: 877

