{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

शिंदोडी l झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील शिंदोडी येथे किराणा दुकानात सामान घेत असताना उपस्थित असणाऱ्या दोन व्यक्तीकडून ” मला आव – जाव का ? घातले नाही म्हणून जातीवाचक शिवीगाळ करत बाप – लेकीला मारहाण केली असताना घारगाव पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदणी करुन सुध्दा कारवाई झाली नसून कुटुंब हे दहशतीत वावरत असून आरोपीस त्वरीत अटक करा अन्यथा आंदोलनाचा इशारा रिपब्लिकन पक्षानी दिला आहे .
सदर मिळालेली माहिती अशी की , संतोष अशोक साळवे व मुलगी आश्विनी हे किराणा साहित्य आणण्यासाठी गावातील एकनाथ खामकर यांचे दुकानात गेले त्यावेळेस तेथे गावातील बापु धोंडीबा कुदनर व सखाराम दरु कुदनर हे तेथे उपस्थित होते. संतोष व आश्विनी यांनी एकनाथ खामकर याचे दुकानातुन किराणा साहित्य व वेफर्स घेतले व ते घरी जाण्याकरीता निघाले असता एकनाथ खामकर यांनी संतोष यांस विचारले की, तु मला आव जाव का घातले नाही ? त्यावेळेस संतोष त्यांना म्हणाला की, माझे कडुन चुकुन तुमचा एकेरी उल्लेख झाला असे म्हणाले चा राग येवुन बापु धोंडीबा कुदनर हा संतोष यांच्या अंगावर धावुन आला व हाताने मारहाण करु लागला त्यावेळेस मुलगी आश्विनी ही सोडवा सोडव करण्याकरीता मध्ये आली असता बापु याने आश्विनी हिला धक्का दिल्याने तेथे उभ्या असलेल्या मोटारसायकल वर पडली व मोटारसायकलच्या सायलेन्सरचा तिच्या उजव्या हाताला चटका बसला त्यानंतर बापू धोंडीबा कुदनर व सखाराम दरु कुदनर यांनी संतोष यांना जातीवाचक शिवीगाळ केली व तुम्ही ” महारडे फार माजले आहात ”  तुम्ही जर आमचे नादी लागला तर तुमच्या पुर्ण कुटुंबाचा खात्मा करुन टाकु अशी जीवे मारण्याची धमकी दिली . तरी आमच्या जीवास बापू धोडींबा कुदनर व सखाराम दरु कुदनर यांच्यापासून धोका असल्याची फिर्याद वैशाली संतोष साळवे यांनी घारगांव पोलिस स्टेशनला दिली असून सुध्दा अदयाप कुठल्या प्रकारे कारवाई झाली नसल्याचे दिसून येत आहे
 
चौकट 
सदरची घटना अतिशय वाईट असून एका १२ वर्षिय मुलीसह संतोष साळवे यांना जातीवाचक बोलून जबर मारहाण करुन दमबाजी करण्याचा प्रयत्न होवू सुध्दा पोलिस यंत्रणा याकडे लक्ष देत नसून पोलिसांनी आरोपीस त्वरीत अटक करावी अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्यावतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपाई संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी दिला .   
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed